मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात

प्रादेशिक हवामान विभागाकडून गुरूवारी दुपारी रेड अलर्ट मागे घेण्यात आला होता. त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसंच शुक्रवारसाठीही हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला होता. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हवामान विभागाकडून गुरूवारसाठी देण्यात आलेला इशारा सर्वांनी गांभीर्याने घेतला होता. परंतु गुरूवारी अनेक ठिकाणी पाऊसच न झाल्यानं हवामान विभागावर अनेकांनी टीका केली.  मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव आदी भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तसंच पवई, घाटकोपर, कुर्ला, दादर, वरळी या भागांमध्येही जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, काही मिनिटांच्या पावसातच सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाण्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. तसंच बुधवारी रात्रीही मुंबई आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती.  

गुरूवारसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर मुंबईत, ठाणे आणि कोकणातील शाळांना तसंच महाविद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. परंतु गुरूवारी पावसाने अनेक ठिकाणी दडी मारल्याचं दिसून आलं होतं.

Web Title: Heavy Rain Started In Mumbai And Suburban Area

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com