जनतेने भाजपला धडा शिकवला : शिवसेना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : युतीतील सर्व सोडून चालले आहेत. असे असले तरीदेखील शिवसेना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहे. जनतेने भाजपला धडा शिकवला आहे. आता फक्त चिंतन नाहीतर आत्मचिंतनाची गरज आहे. हा विजय काँग्रेसचा आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, लोकांचा हा संताप आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार) सांगितले. 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यापैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल होत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, इतर राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. त्यावर आज संजय राऊत यांनी सांगितले, की ''राम मंदिर असो आमचे 25 वर्षांचे नाते यात आम्ही खूश नाही.  हा विजय काँग्रेसचा आहे असे मी म्हणणार नाही. मात्र, लोकांचा हा संताप आहे. आता आत्मपरिक्षणाची गरज आहे''.

Web Title: Peoples teaches lesson to BJP says Shiv Sena

संबंधित बातम्या

Saam TV Live