मोदीसाहेब एकदा तरी कल्याण पूर्वेला येऊन जा

मोदीसाहेब एकदा तरी कल्याण पूर्वेला येऊन जा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत नसल्याने अनेक रस्ते खड्डेमय असून अनेक तक्रारी देऊन फुटपाथ काही मोकळे होत नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार असल्याने लाखो रुपये खर्च करून रस्ता डांबरीकरण, फुटपाथ मोकळे करत आहेत. हा चमत्कार पाहून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्याण पूर्व मधील सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर साद घालत मोदी साहेब एकदा तरी कल्याण पूर्वेला येऊन रखडलेल्या प्रकल्पाना भेट देऊन उदघाटन करण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण पूर्वमधील राजकीय पक्ष, नेते, नगरसेवक, सामाजिक संघटना कल्याण पूर्व मध्ये विविध विकास कामाबाबत पाठपुरावा करत असून अनेक कामे रखडलेले असून पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगत अनेक कामे लालफितीमध्ये अडकली आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कल्याणमध्ये येणार असल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने एका रात्रीत चकाचक केले रस्ते यामुळे कल्याण पूर्व मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला संदेश आणि त्याला दिलेला पाठींबा सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

.....सोशल मीडियावरील पोस्ट
कै. दादासाहेब गायकवाड मैदानाचे, हिरव्या तलावाचे, पत्रीपुलाचे, चाळीच्या मागच्या ड्रेनेज व्यवस्थेचे, उपचार होत नाही अशा पालिकेच्या रुग्णालयाचे, स्वच्छ नसलेल्या एखाद्या शौचालयाचे, पुनर्वसन न झालेल्या घरांचे, यु टाईप रस्त्याचे, खड्डे असलेल्या पुलाचे, शासकिय निधीतुन होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचे, सरकते जिने नाही अशा लोकग्राम ब्रिजचे, पुर्वेत उतरणाऱ्या स्कायवॉकचे, गार्डन्स आरक्षित गायब झालेल्या भुखंडाचे ! नसलेल्या मिनी स्पोर्ट क्लबचे, रस्त्यावरील जिवघेण्या ट्रान्सफॉर्मरचे, खड्डे रहित रस्त्यांचे, अशुद्ध पाणी देणाऱ्या जलकुंभाचे एखाद्या जलवाहीनीचे, वापरात नसलेल्या शववाहिण्याचे, पाच लोक खाल्लेल्या विहिरीचे, हत्तीरोगाची लागण असलेल्या विद्यार्थ्यांच्या परिसराचे, भरमसाठ बिल देणाऱ्या MSEB चे, मैदान नसलेल्या शाळांचे, खिशे कापुन फि घेणाऱ्या शाळा कॉलेजचे, सकाळी लोकल ट्रेनमध्ये घुसता येत नाही अशा लोकलचे !!!

Web Title: PM Narendra Modi visit Kalyan

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com