प्लॅस्टिक लवकरच हद्दपार होईल - रामदास कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : 'राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील 30 टक्के प्लॅस्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या एक कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा दररोज कचरा तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्याने प्रतिदिन एक टन प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा कमी करू शकतो,' असा विश्‍वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

अमनोरा पार्क टाऊनतर्फे टाऊनशिपमधील पाच हजार 500 कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लॅस्टिक परत घेण्याच्या उपक्रमास कदम यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अमनोरा पार्क टाऊन व सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, रिसायकल संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, रीसायकलचे चेतन बारेगर उपस्थित होते. 

या उपक्रमांतर्गत अमनोरामधील कुटुंबांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लॅस्टिक, अशा प्रकारचे प्लॅस्टिक 'रीलूप' या ऍपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. प्लॅस्टिकच्या बदल्यात नागरिकांना प्रतिकिलो 20 गुण म्हणजेच 20 रुपये ऍपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे गुण नागरिक 200 ब्रॅंड्‌सवर खर्च करू शकतील. 

श्रीवास्तव म्हणाले, 'प्लॅस्टिक कचऱ्यात गेल्यास पुनर्निर्मितीची संधी वाया जाते. तसेच कचऱ्यातील प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लॅस्टिकचा संचय व पुनर्निर्मिती गरजेची आहे.' 'अमनोरामध्ये 2010 पासूनच प्लॅस्टिक गोळा करून पुनर्निर्मितीस देण्यास सुरवात केली. ही राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त टाऊनशिप करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,' असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: The problem of Plastic bags will be solved says Ramdas Kadam

संबंधित बातम्या

Saam TV Live