स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारीच

स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारीच

पुणे - स्वारगेट-कात्रज यादरम्यानची मेट्रो भुयारी होणार का एलिव्हेटेड, याबाबतची उत्सुकता आता संपली आहे. ही मेट्रो भुयारीच होणार असून, त्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांनी खर्चाचा तिढा सोडविल्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात होऊ शकते.

स्वारगेट-कात्रज मेट्रो सुमारे ६ किलोमीटर असेल. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार असून, लोकप्रतिनिधींची बैठक झाल्यावर महापालिकेमार्फत तो राज्य सरकारकडे सादर होईल. सर्व शक्‍यतांचा अभ्यास करून हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. एलिव्हेटेड मेट्रो केली असती, तर अंतर सुमारे १२ ते १५ किलोमीटर झाले असते आणि खर्चही वाढला असता. त्यामुळे भुयारी मेट्रोचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एचसीएमटीआर’च्या मार्गावर एलिव्हेटेड पद्धतीने मेट्रो न्यू धावणार आहे. त्याचा आराखडा येत्या सहा महिन्यांत महामेट्रो तयार करणार आहे.  त्यानुसार नेहमीच्या मेट्रोपेक्षा या मेट्रोच्या डब्याचा आकार लहान असेल. तसेच, मेट्रो न्यूसाठी टायर असतील. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची मेट्रो असेल. त्यामुळे या मेट्रोला लोहमार्ग नसेल. पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ५०, तर नाशिकमध्ये सुमारे ३२ किलोमीटर मेट्रो न्यू असेल. नाशिकसाठीचा आराखडा राज्य सरकारला सादर झाला आहे. भविष्यात प्रवासी वाढले, तर लोहमार्ग टाकून मेट्रो अपग्रेड होऊ शकेल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रोचे डबे ऍल्युमिनियमचे!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे १०२ डबे ऍल्युमिनियमचे असतील. त्याचे उत्पादन २५ टक्के इटलीमध्ये होईल, तर जोडणीचे काम ७५ टक्के नागपूरमध्ये महामेट्रोच्या जागेत होणार आहे. मेक इन इंडियाअंतर्गत त्यात महामेट्रोला उत्पादक कंपनीकडून किमान १० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे महामेट्रोला दरवर्षी सुमारे ७०-८० कोटी रुपये मिळतील. पुण्यातील मेट्रोचे डबे ऍल्युमिनियमचे आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-स्वारगेट  ‘पर्पल मेट्रो’?
जगभरातील आणि विविध शहरांतील मेट्रो प्रकल्पांचे नाव रंगसंगतीच्या माध्यमातून दिले जाते. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड-स्वारगेटसाठी ‘पर्पल मेट्रो’, तर वनाज-रामवाडी मार्ग नदीपात्रातून जाणार असल्यामुळे ‘ऍक्वा मेट्रो’असे नाव देण्याचा मानस दीक्षित यांनी व्यक्त केला. 

Web Title: Swargate-Katraj metro subway
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com