कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राकडे काय योजना? सुप्रीम कोर्टाचा सवाल (पहा व्हिडिओ )

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे  यांनी नोंदवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे काय योजना आहेत याची विचारणा सुद्धा सुप्रीम कोर्टानं सरकारकडे केलेली आहे. 

 

देशातील कोरोना Corona संकटाच्या स्थितीबद्दल सुप्रीम कोर्टानं Supreme Court चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणी सारखी स्थिती असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे Sharad bobade यांनी नोंदवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे Central Government काय योजना आहेत याची विचारणा सुद्धा सुप्रीम कोर्टानं Supreme Court सरकारकडे केलेली आहे. What are the plans of Central government to stop Corona 

तर दुसरीकडे, ऑक्सिजनच्या Oxygen पुरवठ्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने सुद्धा केंद्र सरकारला सुनावलं आहे. भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या असा सल्ला हाय कोर्टाने High Court दिला आहे. इथल्या रुग्णालयात Hospital काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात मॅक्स हॉस्पिटलने कोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी हायकोर्टाने केंद्र सरकारला परखड शब्दात जाब विचारला आहे. लोकांचे जीव सरकारसाठी महत्वाचे नाहीत का ? असा सवाल सुद्धा कोर्टाने केंद्र साकारला केला  आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live