भारतीय क्रिकेट संघाचा मायदेशात झालेल्या पराभवाची कारणं काय? वाचा, विराट कोहलीच्या काय चुका झाल्या?

साम टीव्ही
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

कोहलीचं नेतृत्व कुठे कमी पडलं 

एकीकडे विराटची कर्णधार म्हणून कामगिरी कमी पडल्याचं दिसतयं तर त्याचवेळी जो रुटच्या नेतृत्व शैलीनं इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा मायदेशात झालेला पराभव हा अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरलायं. गोलंदाज,फलंदाज,सांघिक कामगिरी अशा सगळ्याच आघाड्यांवर भारतीय संघ अपयशी ठरल्याचं सगळेच बोलतायंत. पण या सगळ्यांची मोट बांधणाऱ्या विराट कोहलीच्या काय चुका झाल्या हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

चेन्नई येथे होणाऱ्या प्रत्येकी कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरतो. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.आणि त्याच्यासकट त्याच्या संघ सहकाऱ्यांनी तो सार्थ ठरवला. इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं भारतीय फिरकी गोलंदाजीचा यशस्वी सामना करत द्विशतकी खेळी केली. जो रुट यानं पहिल्या कसोटी सामन्यात २१८ धावांची खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला. रुटच्या अर्धशतकाच्या बळावर पहिल्या डावांत इंग्लंड संघानं ५७८ धावांचा डोंगर उभा केला.

"विशेष रणनिती दिसली नाही"

तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्याची योजना भारतीय संघाच्या अपयशाला कारणीभूत ठरली. आर. अश्निनचा अपवाद वगळता इतरांना आपला प्रभाव पाडता आला नाही. सुंदर आणि नदीम गोलंदाजीत अपयशी ठरले.

"शादाबला संघात स्थान देण्यामागे काय भूमिका होती"

अननुभवी फिरकी गोलंदाज लीच आणि बेस यांच्या जाळ्यात भारतीय दिग्गज फलंदाज अडकले. पहिल्या डावात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारासारखे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या दोन फिरकीपटूंनी ११ बळी घेतले आहेत.भारतीय संघातील आघाडीचे आणि अनुभवी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची खराब कामगिरी पराभवाचं कारण आहे. दोन्ही डावांत रोहित-रहाणेला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. अजिंक्य रहाणेला तर दोन्ही डावात दोन आकडी संख्याही ओलांडता आली नाही.

"फलंदाजांनी लौकीकाला साजेशी कामगिरी केली नाही"

कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याची चूक विराट कोहलीला महागात पडली. विराट कोहलीनं कुलदीपऐवजी शाबाज नदीमला संघात स्थान दिलं. मात्र, नदीमला आपली कामगिरी उंचावता आली नाही.

कोहलीचं नेतृत्व कुठे कमी पडलं

एकीकडे विराटची कर्णधार म्हणून कामगिरी कमी पडल्याचं दिसतयं तर त्याचवेळी जो रुटच्या नेतृत्व शैलीनं इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. गोलंदाजाचा योग्य पद्धतीनं वापर केला. शिवाय पहिल्या डावांत मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतरही फॉलोऑन देण्याचा निर्णय न घेता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान असे अनेक निर्णय घेत जो रुटनं इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्यामुळे आता भारतीय संघावर दबाव वाढला असून आता भारतीय संघ कमबॅक कसा करतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live