कोरोनाची लक्षणं दिसल्यास काय कराल ?

कोरोनाची लक्षणं दिसल्यास काय कराल ?

मुंबई :कोरोनाबाबत जनतेच्या मनात भीती आणि काही गैरसमज आहेत. देशात कोरोना विषाणूचे 104  बाधित आहे . तर राज्यात हा आकडा सध्या  31  वर आहे. कोरोनाबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळणे आणि शिक्षण होणे गरजेचे आहे असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयानं जनजागृती मोहीम राबवली आहे. आरोग्य मंत्रालयानं  प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन क्रमांक पुरवले  आहेत. विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करताना सुरु होणाऱ्या सुचनांच्या शेवटी हा हेल्पलाइन क्रमांक ऐकू येतो. या हेल्पलाइन क्रमांकवर फोन केल्यास तुम्हाला कोरोनाच्या चाचणी आणि उपचारांसंदर्भात मदत प्राप्त होईल. त्याचप्रमाणे पुण्यात नायडू आणि मुंबईत कस्तूरबा रुग्णालयात उपचारांसाठी स्वतंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

हेही वाचा :: मुंबईत करोनाचे 10 रुग्ण
 
रुग्ण परदेशात प्रवास करुन भारतात आले आहेत किंवा कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. देशात कोरोना विषाणूचे 104  बाधित आहे . तर राज्यात हा आकडा सध्या  31  वर आहे.  त्यामुळे तुम्ही परदेशातून प्रवास करून आलात किंवा अशा  व्यक्तींच्या संपर्कात आलात आणि तुमच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची प्रमुख लक्षणं आढळली असतील तर त्वरीत तपासणी करा. कोरोनाची चाचणी केल्यानंतर १४ दिवस त्या व्यक्तीस देखरेखीखाली ठेवले जाते. ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, कफ, छातीत दुखणे, सर्दी, डोकेदुखी,  थकवा जाणवणे, न्यूमोनिया ही काही  कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. 


-आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाणं टाळा.
- टिश्यू वापरला असेल तर तो लगेच फेकून द्या , हात स्वच्छ धुवा
- खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा
-हात स्वच्छ न धुता डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळा
- साबण, पाणी किंवा हँड सॅनिटायझरनं हात स्वच्छ धूवा 


कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही मात्र प्रत्येकानं सतर्क राहून खबरदारी जरूर घेतली पाहिजे. जर डिसेंबर ते मार्च या काळात तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील व्यक्ती चीन, इटली, कोरिया, इराण किंवा  अन्य मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित देशातून परतली असेल आणि काही दिवसांत त्यामध्ये वरील लक्षणं आढळू लागली तर त्वरित हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून उपचार घ्या. 

WebTittle ::  What do you do if you see corona symptoms?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com