सचिन वाझेंना कोर्टात आणल्यानंतर नेमकं काय घडलं?

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी
'ती' इनोव्हा कारही मुंबई पोलिसांची
अडकलेल्या सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात

 

 

 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलीय. सचिन वाझेंवरील कारवाईवरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. 

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार सचिन वाझेंनी काही महिने वापरल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच त्या स्कॉर्पिओसोबत असलेली इनोव्हा कारही मुंबई पोलिसांचीच असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दुसरीकडं एनआयएनं अटक केलेल्या सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आलीय.

 केंद्र सरकार तपाससंस्थांच्या आधारे बिगरभाजप शासित राज्यांमध्ये दहशत माजवत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

 भाजपनं या प्रकरणी शिवसेनेवर हल्लोबोल केला असून वाझेंना सेना पाठिशी घालत असल्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

 सचिन वाझे प्रकरणामुळं आता पोलिस खातं ढवळून निघण्याची शक्यता आहे. येत्या काळात सचिन वाझेंचे काही साथीदारही एनआयएच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live