मराठा आरक्षणाच्या कालच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

साम टीव्ही
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

मराठा आरक्षणाची सुनावणीला आता 8 मार्चपासून सुरू होणाराय. संपूर्ण राज्याचं लक्ष या​ सुनावणीकडे लागलंय. आज सर्वोच्च न्यायालयात नेमक्या काय घडामोडी घडल्या त्याचा आढावा घेऊयात.

 मराठा आरक्षणाची सुनावणीला आता 8 मार्चपासून सुरू होणाराय. संपूर्ण राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलंय. आज सर्वोच्च न्यायालयात नेमक्या काय घडामोडी घडल्या त्याचा आढावा घेऊयात.

 राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न बऱ्याच काळापासून रखडलाय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यानंतर मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात केवळ तारखांमागून तारखाच पडत राहिल्या. शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणावर ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुनावणीचा कालावधी निश्चित केलाय.  ८ मार्च ते १८ मार्चदरम्यान ही सुनावणी पार पडणार असून या निर्णयावर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आनंद व्यक्त केलाय. 8 मार्च ते 18 मार्चपर्यंत कशी असेल सुनावणी त्यावर एक नजर टाकूयामराठा आरक्षण सुनावणी (हेडर).

8 ते 18 मार्च कशी असेल सुनावणी?

 8 ते 10 मार्च - मराठा आरक्षणाला विरोध करणारे बाजू मांडतील

12 ते 17 मार्चदरम्यान मराठा आरक्षणाचे समर्थक आपली बाजू मांडतील. यामध्ये मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि याचिकाकर्त्यांना वेळ देण्यात आलाय.18 मार्च - केंद्राच्या वतीने बाजू मांडण्यात येईल प्रत्येकाला आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सादर करावं लागेल दरम्यान मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय. सध्या संसंदेचं अधिवेशन सुरु आहे. त्यामुळं केंद्रानं मराठा आरक्षणासाठी घटनात्मक तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केलीय.अशोक चव्हाण, अध्यक्ष, मराठा आरक्षण उपसमिती   सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा समाजामध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानं मराठा तरुणांमध्ये नाराजीचा सुर आहे. आता मार्चमध्ये होणाऱ्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे.. 


संबंधित बातम्या

Saam TV Live