शेअर बाजार: लोअर सर्किट म्हणजे काय?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 मार्च 2020
  • एखाद्या शेअरची एका दिवसात होणारी हालचाल, तेजी किंवा घसरण मर्यदित ठेवण्यासाठी जे प्रमाण निश्चित केले आहे त्याला सर्किट ब्रेकर असे म्हणतात.
  • तेजीला वेसण घालण्यासाठी 'अप्पर' सर्किट तर घसरणीला मर्यादित ठेवण्यासाठी 'लोअर' सर्किट.

मुंबई: मुंबई शेअर बाजारात आतापर्यंतची सगळ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी दुपारी तब्बल 3 हजार 79 अंकांनी कोसळला होता. कोरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे बाजारातील सर्व व्यवहार तात्काळ तासाभरासाठी बंद करण्यात आले होते. बाजार पुन्हा उघडल्यानंतर बऱ्यापैकी सावरला असला तरी 2008 नंतर पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये एवढी मोठी घसरण झाली होती. गेल्या 13 वर्षांत पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट लागलं.

मात्र लोअर सर्किट म्हणजे काय?
एखाद्या शेअरची एका दिवसात होणारी हालचाल, तेजी किंवा घसरण मर्यदित ठेवण्यासाठी जे प्रमाण निश्चित केले आहे त्याला सर्किट ब्रेकर असे म्हणतात. म्हणजे तेजीला वेसण घालण्यासाठी 'अप्पर' सर्किट तर घसरणीला मर्यादित ठेवण्यासाठी 'लोअर' सर्किट. ठराविक दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली किंवा बाजारीने उसळी घेतल्यास लोअर किंवा अप्पर सर्किट लावले जाते. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्यास लोअर सर्कीट लावले जाते. कमी कालावधीमध्ये सर्वच शेअर्सचे भाव गडगडल्यास लोअर सर्किट लावले जाते. लोअर सर्किट म्हणजे एका ठराविक किंमतीपेक्षा कमी दराला शेअर्स विकण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये आणखीन पडझड होत नाही.
सर्वसाधारण शेअरप्रमाणेच सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या निर्देशांकांना देखील सर्किट लिमिट असते. मात्र त्याचे प्रमाण आणि लिमिट कालावधी वेगळा असतो. निर्देशांकांना 10, 15 आणि 20 टक्के याप्रमाणे सर्किट लागते. म्हणजे एखाद्या दिवशी या निर्देशांकांमध्ये 10, 15 आणि 20 टक्क्यांच्या प्रमाणात तेजी किंवा घसरण झाली तर निर्देशांकाचे कामकाज विशिष्ट कालावधीसाठी थांबविले जाते. दरम्यान जे शेअर फ्युचर अँड ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये उपलब्ध असतात त्यांना सर्किट लागत नाही.

 

Webtitle: What is the meaning of lower circuit market?


संबंधित बातम्या

Saam TV Live