राम मंदिर आणि बाबरी मस्जिदीचा एकमेकांशी संबंध काय?

सिध्देश सावंत
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

कौशल प्रदेशाची प्राचीर राजधानी अवध आणि त्यानंतर साकेत अशी ओळख मिळाली, असं अभ्यासक सांगतात. त्यानंतर अवधचंच नाव मॉडिफाय करुन अयोध्या असं झाल्याचं बोललं जातं. अयोध्या पहिल्यापासून मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आजही अयोध्येत हिंदू, बौद्ध आणि जैन मंदिरं असल्याचा खुणा आढळतात.

आता पाहणार आहोत , राम मंदिर आणि बाबरी मस्जिदीचा एकमेकांशी संबंध काय? अयोध्या हे नाव कसं आलं कुठून आलं?

कौशल प्रदेशाची प्राचीर राजधानी अवध आणि त्यानंतर साकेत अशी ओळख मिळाली, असं अभ्यासक सांगतात. त्यानंतर अवधचंच नाव मॉडिफाय करुन अयोध्या असं झाल्याचं बोललं जातं. अयोध्या पहिल्यापासून मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आजही अयोध्येत हिंदू, बौद्ध आणि जैन मंदिरं असल्याचा खुणा आढळतात.

 

जैन अभ्यासकांच्या मते, अयोध्येत आदिनाथासह पाच तीर्थकारांचा जन्म झाला होता. बौद्ध अभ्यासकांच्या मते, भगवान बुद्धाने महाविहार अयोध्येत तयार केल्याचं सांगितलं जातं. 

अयोध्या राजा दशरथ आणि राम जन्म

सूर्याचा पूत्र वैवस्वत मनूने अयोध्या रचली असं म्हणतात. तेव्हापासूनच या नगरीत सूर्यवंशी राजांची सत्ता होता. महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजांची अयोध्ये राज्य केल्याचे उल्लेख आढळतो. अयोध्येतील राजा दशरथाच्या महालात श्रीरामप्रभूंचा जन्म झाला, असं लिहून ठेवल्याचे दाखेल दिले जातात. 

महर्षी वाल्मिकींनी रामायणाची अयोध्येची तुलना इंद्रलोकाशी म्हणजेच थेट स्वर्गाशी केली आहे. अयोध्या ही सर्वसंपन्न आणि वैभवाने नटलेली अशी नगरी होती, हे वाल्मिकींचं रामायण वाचल्यास लक्षात येतं. 

रामाने जेव्हा जलसमाधी घेतली, त्यावेळी अयोध्या ही विराण झाली होती. भकास असं रुप अयोध्येने धारण केलं होतं. मात्र रामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण जसंच्या तसं होतं.  श्रीरामाचा पुत्र कुश याने अयोध्येचा पुनर्निमाण केला. यानंतर अयोध्येत दशरथाच्या पुढच्या ४४ पिढ्या बिनदिक्कत नांदल्या. 

बृहब्दल राजा हा ४४व्या पिढीतील होता. त्याचा मृत्यू हा महाभारतातली अभिमन्यू हस्ते झाल्याचे उल्लेख आढळतात.

महाभारतातील युद्धानंतरही अयोध्या पुन्हा भकास झाली. मात्र यावेळीही रामजन्मभूमी अबाधित राहिली होती. 

राममंदिर कुणी बांधलं?

इसवी सन पूर्व १०० वर्षांपूर्वी  उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य अयोध्येवर चाल करुन आला. थकल्यामुळे विक्रमादित्य शरयुनदीच्या किनारी विश्रांती करु लागाला.  आपल्या संपूर्ण सैन्यासह विक्रमादित्य शरयुतिरी थांबला. त्यावेळी शरयुचा तीर हा जंगलाने वेढलेला होता. वस्तीही फारशी नव्हती.  विक्रमादित्यला अचानक या भूमीचे चमत्कार दिसू लागले, असं म्हणतात. त्यावेळी चौकशी केल्यानंतर विक्रमादित्य ही रामजन्मभूमी असल्याची कल्पना आली. 

सम्राट विक्रमादित्याने हे लक्षात येताच रामाचं एक भव्यदिव्य मंदिर उभारलं. एका विशिष्ट काळ्या दगडाच्या साहाय्याने विक्रमादित्याने त्या काळी ८४ स्तंभांच्या आधारे विशाल मंदिराचा निर्माण केला होता. विक्रमादित्य नंतर कालांतराने त्यांच्या पुढच्या वारसदारांनी राममंदिराची देखभाल केली. जीर्णोद्वार केले. 

अयोध्येवर आक्रमण आणि राम मंदिर

इसवीसन पूर्व ६०० वर्षांपूर्वी एक व्यापाराचं प्रमुख केंद्र बनलेलं होतं. अयोध्येला आतंरराष्ट्रीय ओळख मिळालेली होती. अयोध्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची नगरी बनली होती. त्यावेळी अयोध्या साकेतनगरी म्हणून ओळखली जायची. चीनी भिक्षुकांनी अयोध्येली बौद्ध विहारांचा आधारा घेतला. सातव्या शतकात चीनी यात्री अयोध्येत आले असल्याचं सांगितलं जातं. हेनत्सांग नावाचा एक चीनी यात्री अयोध्येला आला. त्याच्यासोबत तब्बल ३ हजार चीनी भिक्षुक राहत असल्याचं बोललं जातं अयोध्येत त्या काळी एक प्रमुख हिंदू मंदिर देखील होते, ज्या मंदिरात हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी आणि पूजेसाठी येत असतं. 
यानंतर ई.स. पूर्वी ११व्या शतकात कैनोज नरेश जयचंद्रचं राज्य सुरु झालं. राममंदिरावर असलेलं विक्रमादित्यचा शिलालेख जयचंद्रला पाहावला नाही. त्याने त्यावर स्वतःचं नाव कोरलं. पानिपत युद्धानंतर जयचंद्राचाही अस्त झाला. यानंतर भारत वर्षात आक्रमणं अधिकच वाढत गेली. 

अनेक आक्रमणं झाली, लढाया झाल्या, हिंदूंवर नानाप्रकारे सत्ता गाजवण्यात आली. मात्र या सगळ्यातही राममंदिरावर कोणतंही संकट आलं नाही. वर्षानुवर्ष राममंदिर हे १४व्या शतकापर्यंत अबाधित राहिलं. 

सिकंदर लोदीच्या साम्राज्यातही राममंदिर अयोध्येत अबाधित होतं, असं सांगितलं जातं. १४व्या शतकात मुघलांनी भारतावर आक्रमण केलं. मुघलांनी राममंदिर नष्ट करण्यासाठी हालचाली सुरु केल्या, असं इतिहासकार सांगतात. अखेर १५२७-२८मध्ये विशाल राममंदिर पाडण्यात आलं. आणि त्याठिकाणी बाबरी मस्जिद उभारण्यात आली असल्याचा दावा केला जातो. 

असं म्हणतात, की मुघल साम्राज्याचा सम्राट बाबर याच्या एका सेनापतीने बिहार अभियानादरम्यान,  रामाचं मंदिर तोडून मस्जिद उभारण्याचं काम केलं. प्राचीन रुपात तयार करण्यात आलेली ही मस्जिद १९९२ पर्यंत अबाधित होती. 

१५२८ मध्ये सम्राट बाबरने मस्जिद निर्माणाचा आदेश दिला होता. राममंदिरा पाडून मस्जिद उभी केली जावी, असा बाबरने आदेश दिल्याच इतिहासकार सांगतात. 

असंही सांगितलं की, अकबर आणि जहाँगीरच्या साम्राज्यात हिंदूंना अयोध्येतील भूमी एका चबुतऱ्याच्या रुपात देण्यात आली होती. मात्र क्रूर शासक औरंगजेबाने आपला पूर्वक बाबरच्या स्वप्नाखातर रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मस्जिद उभारली. बाबर नावारुनच या मस्जिदीला बाबरी मस्जिद असं नाव देण्यात आलं होतं.

आता काय होणार?

राम जन्मभूमीचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याबाबतचा युक्तीवादही आता पूर्ण झाला आहे. अशात लवकरच सुप्रीम कोर्ट आणि रामजन्मभूमीबाबत नेमका काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंय. 

शिवसेनेने भाजपसोबत राममंदिराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीला लावून धरला होता. आता विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा विषय पुन्हा एकदा राजकीय पटलावर वेगळा रंग घेईल, अशी चर्चा जोर धरतेय.  

WebTittle :: What is the relationship between Ram Temple and Babri Masjid


  


संबंधित बातम्या

Saam TV Live