पेन्शन वेळेत मिळण्यासाठी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काय करावे...

पेन्शन वेळेत मिळण्यासाठी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काय करावे...

मुंबई- कर्मचाऱ्याने सेवानिवृत्त होण्याच्या दोन वर्ष अगोदर निवृत्ती वेतन प्रकरण सुरू करायला पाहिजे. सुरवातीला वेतन पडताळणी आवश्यक असते. त्यानंतर कार्यालयातर्फे एक सेवानिवृत्ती आदेश काढला जातो.

गेल्या पाच वर्षात ज्या-ज्या ठिकाणी तो काम करत होता. त्या ठिकाणाहून ना देय प्रमाणपत्र घ्यावयाचे असतात. त्याच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. सहा महिन्याअगोदर ही सर्व प्रकरणे महालेखापालाकडे सुपुर्द करावे. त्यामुळे निवृत्त झालेल्या दिवशी निवृत्तीवेतन विना विलंब मिळते.

वेतन पडताळणी म्हणजे काय?

प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1980 मधील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयाने तयार करावयाचे असते. सेवा पुस्तकात कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ते निवृत्तीच्या दिनांकापर्यंत सर्व नोंदी, विशेष करून वेतनाबाबतच्या नोंदी नमूद करावयाच्या असतात. या सर्व नोंदी अचूक नियमानुसार आहेत का हे पडताळणे आवश्यक असते. त्यास वेतन पडताळणी म्हणतात.

वेतन पडताळणी करतांना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात

पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी, नाव बदलाची नोंद, वार्षिक वेतनवाढ नोंद मानवी दिनांक/वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी, हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सूट मिळाल्याची नोंद, पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजना एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद, बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्ती आदेशाची नोंद, बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्तीनुसार कार्यमुक्त/ हजर/ पदग्रहण अवधी नोंद व इतर.

हयातीचा दाखला म्हणजे काय? तो कसा सादर करावा?

निवृत्ती वेतन धारकाला हयातीचा दाखला वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करावा लागतो. हयातीचा दाखला प्राप्त झाला नाही तर, निवृत्ती वेतन बंद करण्यात येते.

हयातीचा दाखला व्यक्तीगतरित्या जिल्हा कोषागरात पोस्टाद्वारे किंवा विविध बँकामध्ये व्यक्तीगतरित्या हजर राहून सादर करावा लागतो. पोलिस स्टेशनचा फौजदार किंवा ग्रामपंचायतीचे अधिकारी, दंडाधिकाऱ्यामार्फत देऊ शकतो.

WEB TITLE- What should retirees do to get their pension timely ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com