रामजन्मभूमीच्या वादाआधी रामजन्माची कथा काय सांगते

सिध्देश सावंत
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

ज्या रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे, त्या रामाचा जन्म नेमका झाला तरी कुठे.. आणि कसा यामागची कथा काय आहे, हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.
राम कोण होता, अयोध्येत तो कुठून आला, आताचं श्रीलंका म्हणजेच रामायणातली लंक आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जातात. यासगळ्याबाबत अनेक वादविवाद पाहायला मिळतात. पण रामजन्माची कथा नेमकं काय सांगते आणि ती कुणी लिहीले, हे उलगडणंही महत्त्वाचंय.चला तर पाहूयात नेमकी राम जन्माची कथा काय आहे.

 

ज्या रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे, त्या रामाचा जन्म नेमका झाला तरी कुठे.. आणि कसा यामागची कथा काय आहे, हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.
राम कोण होता, अयोध्येत तो कुठून आला, आताचं श्रीलंका म्हणजेच रामायणातली लंक आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जातात. यासगळ्याबाबत अनेक वादविवाद पाहायला मिळतात. पण रामजन्माची कथा नेमकं काय सांगते आणि ती कुणी लिहीले, हे उलगडणंही महत्त्वाचंय.चला तर पाहूयात नेमकी राम जन्माची कथा काय आहे.

 

रामाचा जन्म कुठे अयोध्येत झाला, असं म्हणतात. अयोध्येत कुठे झाला, यावर सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे. काही दिवसांतच याबाबतचा निर्णय येईल. त्याआधी यासंदर्भात वादळी चर्चा सुप्रीम कोर्टात झाली. राम मंदिराचा मुद्दा राजकीय गणितातही महत्त्वाचा आहे. मतांचं राजकारण, राम मंदिरा, बाबरी मस्जिद, सामाजित तेढ या सर्वाच्या अनुषंगाने रामचा जन्म नेमका कुठे झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही व्हायला हवा.

रामजन्माची कथा काय सांगते

दशरथाचं वय होत चाललं होतं. त्यांचा वंश सांभाळण्यासाठी कुणीही नव्हतं. पुत्रप्राप्तासाठी राजा दशरथाने एक यज्ञ करण्याचं ठरवलं.दशरथाच्या एका मंत्र्यांने त्याला सल्ला दिला की त्याने एक आपल्या जावयाकडून हा यत्र करुन घ्यावा. ब्रम्हा श्री वशिष्टी हे दशरथाचे कुलगुरु होते. ते त्यांचे धर्मगुरुही होते आणि धार्मिक मंत्रीही. वशिष्टींनाच फक्त दशरथाचे सर्व धार्मिक विधी करण्याचा अधिकाह असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे वशिष्टींची आज्ञा घेवून आपल्या जावयाला यज्ञ करावयास सांगितला. 

हा यज्ञ यथासांग पार पडला. पुत्रकामेष्ठी असं या यज्ञानं नाव होतं. हा यज्ञ पार पडल्यानंतर अग्निकुंडातून एक दिव्यपुरुष प्रकटला. या दिव्यपुरुषाने दशरथाला प्रसाद दिला आणि हा प्रसाद आपल्या पत्नीला खायला देण्यास सांगितले. दशरथ खूश झाला आणि त्याने हा प्रसाद आपल्या पत्नींनी खावयास दिला.

दशरथाला एकून तीन बायका होत्या. पहिली कौसल्या, दुसरी कैकेई आणि तिसरी सुमित्रा. दिव्यपुरुषाने दिलेला प्रसादाचे दोन भाग केले. या प्रसादाचा अर्धा भाग राजा दशरथाने कौसल्येला दिला. त्यानंतर उतरलेल्या अर्ध्या भागाचे आणखी दोन भाग केले. यातील काही भाग सुमित्रेला आणि काही भाग कैकेईला देण्यात आला. विशेष म्हणजे कैकेईला देण्यात आलेल्या प्रसादातीलही काही भाग का पुन्हा सुमित्रेला राजा दशरथाने दिला. 

त्यामुळे राम कौसल्येपासून, भरत कैकेईपासून आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रेपासून जन्माला आले असं सांगितलं जातं. 

इतिहासतज्ज्ञ काय सांगतात

इतिहासाचे अभ्यासक म्हणतात की कौशल प्रदेशाची प्राचीन राजधानी, जिला अवध म्हणून ओळखलं जायचं, तीच ही अयोध्या होय. ही अयोध्या साकेत म्हणून बौद्धकाळात प्रसिद्ध होती.  अयोध्या हे पहिल्यापासूनच मंदिराचं शहर होतं. आजही या ठिकाणी हिंदू, बौद्ध आणि जैन मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. 

या अयोध्येचा राजा होता दशरथ. दशरथाच्या अयोध्येतील महालातच रामाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. सूर्यवंशी राजांचं साम्राज्य अयोध्येवर राज्य करत असल्याचं सांगितलं जातं. महाभारत काळापर्यंत याचा उल्लेख असल्याचं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे. वालिम्की ऋषींनी रामायणात अयोध्येचा उल्लेख करताना इंद्रलोकाशी रामजन्मभूमीची तुलना केली आहे. 

 

दरम्यान, बाबरी मस्जिद आणि रामजन्मचा संबंध कसा आला, याचाही सखोल अभ्यास करणार आहे, एका सविस्तर लेखातून...


संबंधित बातम्या

Saam TV Live