वाचा, कसा असेल मराठा आरक्षणाचा कायदेशीर प्रवास?

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020
  • कसा असेल मराठा आरक्षणाचा कायदेशीर प्रवास ?
  • मराठा आरक्षणाबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टात काय होणार?
  • मराठा आरक्षणासाठी काय आहेत कायदेशीर पर्याय?

मराठा आरक्षणाचं काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्यासाठी कायदेशीर पर्यायांवरही चर्चा होतीय. काय असू शकतात हे पर्याय. पाहुयात एक रिपोर्ट

मराठा आरक्षणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदेशीर प्रवास कसा असेल यावर आता खल सुरु झालाय. मराठा समाजाकरता एक वेगळा वर्ग तयार करण्यात आलाय, मात्र अशी कोणतीही तरतूद घटनेत नाही, असं ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरि अणेंनी म्हटलंय.

  • तमिळनाडू, राजस्थान, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात आलीय.
  • तमिळनाडूचंच आरक्षण ग्राह्य धरण्यात आलंय.
  • मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारला घटनादुरुस्ती करावी लागेल
  • ही घटनादुरुस्ती लोकसभा, राज्यसभेत पास करावी लागेल
  • मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला घटनादुरुस्तीचा मार्ग अवलंबावा लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं इच्छाशक्ती दाखवली तर मराठा आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल हे नक्की
     


संबंधित बातम्या

Saam TV Live