काय असेल मायावतींची भूमिका; 'हाथी किसका साथी'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये अंतिम निकालानंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये कमी जागांचे अंतर राहिले तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या पक्षाला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मायावती ज्या बाजूला जातील त्यांचे सरकार येईल, असे होऊ शकते.

एका अर्थाने सत्तेची चावी ही बसपाच्या म्हणजेच मायावतींच्या हातात राहू शकते. तसे झाले तर मायावती कुणाकडे जातील हे आताच निश्चित सांगणे कठीण आहे परंतु, सत्तेची सर्व समीकरणे मायावतींच्या हातात असणार हे नक्की ! मायावती जिथे असणार तिथे मध्यप्रदेशची सत्ता असणार ! छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये बसपाची निश्चित अशी व्होट बँक आहे. मायावती यांनी निवडणूकपूर्व युती काँग्रेससोबत करावी, असे प्रयत्न काँग्रेसकडून झाले पण मायावती यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतंत्र लढून बऱ्यापैकी यशही मिळवले आहे.

एकूण मायावतींची राजकीय पार्श्वभूमी पाहिल्यास मायावतींच्या राजकीय भूमिकेचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र काही शक्यता वर्तविल्या जाऊ शकतात. मायावतींचा पक्ष राष्ट्रीय राजकारणात असला त्यांचा जीव हा उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे मध्य प्रदेशबाबत निर्णय घेताना मायावती तो निर्णय उत्तर प्रदेशातील राजकारणाचा विचार करून त्या अंगाने घेतील असे वाटते.

Web Title: what will be Mayawatis stand after results

संबंधित बातम्या

Saam TV Live