वाचा, अंतिम वर्षाची परीक्षा कशी असेल?

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020
 • अंतिम वर्षाची परीक्षा कशी असेल?
 • सोलापूर विद्यापीठानं बनवलाय मास्टरप्लान?
 • विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा, परीक्षा होणारच !

अंतिम वर्षाची परीक्षा होणारच हे निश्चित झालंय. पण, ही परीक्षा कशी घेतली जाऊ शकते याचा मास्टरप्लान तयार करण्यात आलाय. कशी असेल अंतिम वर्षाची परीक्षा पाहुयात हा रिपोर्ट.

सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिल्यानंतरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा कशी होणार? परीक्षेचं नियोजन कसं असेल?याबाबत जवळपास 7 लाख विद्यार्थ्यांची चिंता वाढलीय. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचंय. पण, सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं अंतिम परीक्षा घेण्यासाठी मास्टरप्लान तयार केलाय.

कशी असू शकते अंतिम परीक्षा?

 • 60 टक्के विद्यार्थ्यांची ऑनलाईन तर 40 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेण्याची शक्यता
 • एरव्ही 3 बेंचवर 6 विद्यार्थी बसवतात. आता मात्र 3 बेंचवर एकच विद्यार्थी बसू शकणार
 • ऑनलाईनची सुविधा असलेले विद्यार्थी घरबसल्या परीक्षा देऊ शकतील.
 • या नियोजनासाठी विद्यापीठाकडून 'प्रॉक्टरिंग' या नव्या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. 

कशी आहे 'प्रॉक्टरिंग' प्रणाली? 

 • ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या 50-60 विद्यार्थ्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पर्यवेक्षक
 • कंम्प्युटरद्वारे पर्यवेक्षक 3 तासांपर्यंत विद्यार्थ्यांवर वॉच ठेवतील
 • नव्या प्रणालीद्वारे विद्यार्थ्याची हालचाल आणि आजूबाजूचा वेगळा आवाज ओळखणं शक्य
 • विद्यार्थ्याजवळ दुसरी व्यक्ती आल्यास त्याची माहिती मिळू शकणार
 • ही प्रणाली बहुतांश विद्यापीठांकडून वापरली जाऊ शकते असंही सांगितलं जातंय.
 • हे सगळं कोरोनाची स्थिती जाणून नियोजन करावं लागणाराय. जर सोलापूर विद्यापीठाचा पॅटर्न सगळीकडेच राबवणं शक्य झाला तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत परीक्षा घेणं सोयीस्कर होईल. विश्वभूषण लिमये साम टीव्ही सोलापूर


संबंधित बातम्या

Saam TV Live