अनिल देशमुखांचं काय होणार? देशमुखांच्या मंत्रिपदाचा दिल्लीत फैसला?

साम टीव्ही
सोमवार, 22 मार्च 2021

अनिल देशमुखांचं काय होणार?
देशमुखांच्या मंत्रिपदाचा दिल्लीत फैसला?
राष्ट्रवादी देशमुखांची पाठराखण करतेय का?

 

 

 

 

अनिल देशमुखांचं काय करायचं, असा संभ्रम राष्ट्रवादीत झालाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय. पण पवारांनी देशमुखांच्या राजीनाम्याचा दिल्लीत फैसला होणार असल्याचं सांगितलंय.

गृहमंत्री अनिल देशमुखांचं काय होणार अशी चर्चा नागपूर आणि मुंबईपासून दिल्लीतपर्यंत सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं अनिल देशमुखांबाबत थोडीशी सावध भूमिका घेतलीय. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय.

 शरद पवारांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत मात्र थोडी वेगळी भूमिका घेतली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करुन देशमुखांच्या मंत्रिपदाचा फैसला करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

 निवृत्त डीजी विद्यमान गृहमंत्र्यांचा तपास कसा करणार असा सवाल विरोधी पक्षानं उपस्थित केलाय.

 देशमुखांवर झालेले आरोप गंभीर असल्याचं पवार सांगतात. या प्रकरणाची चौकशी निवृत्त डीजींमार्फत करण्याची सूचनाही त्यांनी केलीय. पण देशमुखांना हटवणारच असं काहीच पवार बोलत नाहीयेत. त्यामुळं देशमुखांना अभय मिळालं का? अशी चर्चा सुरु झालीय.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live