महेंद्रसिंग धोनी रियारमेंटनंतर करणार काय? क्रिकेट, शेती, शिक्षणासोबत राजकारणही?

साम टीव्ही
सोमवार, 17 ऑगस्ट 2020
 • महेंद्रसिंग धोनी रियारमेंटनंतर करणार काय?
 • कशी असेल धडाकेबाज धोनीची सेकंड इनिंग? 
 • क्रिकेट, शेती, शिक्षणासोबत राजकारणही?

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिटायर झालाय. त्याच्या निवृत्तीनंतर आता त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडलाय, धोनीची नवी इनिंग कोणती असणार? बघुयात..

महेंद्रसिंग धोनी. धडाकेबाज फलंदाज. चपळ यष्टीरक्षक, चतूर कर्णधार, जिगरी यार. आणि दिलखुलास माणूस. अनेकांचा लाडका माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण आता धोनीची पुढची इनिंग कुठली असणार, याची जोरदार चर्चा रंगलेय. बघुयात काय आहेत, धोनीचे रिटायरमेंट प्लान्स.

 • अशी असेल धोनीची सेकंड इनिंग
 • धोनी कृषी क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याचं कळतंय.. 
 • नियो ग्लोबल फर्टिलायझर हा ब्राण्ड मार्केटमध्ये आणण्याचा धोनीचा विचार आहे 
 • कृषी उपकरणं आणि इतर उत्पदानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा मानस आहे 
 • तसंच शिक्षणक्षेत्रातही धोनीला काम करायचंय
 • देशाभरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी धोनी एक शाळा सुरु करण्याच्या तयारीत आहे
 • या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा त्याचा मानस आहे 
 • याशिवाय धोनीने क्रिकेट अकॅडमीची सुद्धा सुरुवात केली आहे 
 • यामाध्यमातून गावागावातील क्रिकेटपटू टीम इंडियापर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न राहिल 

धोनीच्या क्रिकेट करिअरची खासियतच ही होती, की तो कायम नव्या नव्या रुपात. नव्या नव्या युक्त्यांनी नवी आव्हान पेलून गेला. या रिटायरमेंट प्लान्ससोबतच धोनीला राजकारणात येण्याच्या ऑफरही येऊ लागल्यात. धोनीचं नेतृत्त्व कौशल्य अवघ्या देशाला ठाऊक आहेच. मात्र सार्वजनिक आयुष्यात थोडासा बुजरा वाटणारा धोनी राजकारणाची वाट सुद्धा धुंडाळतो का? तेही पाहावं लागेल. 

पण माही जे काही करेल.. ते बेस्टच असेल. याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात शंका असण्याचं कारणच नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live