Whatsapp चे डार्कमोड फिचर पाहिलं का?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

 

 Whatsapp युजर्ससाठी गुड न्यूज आहे. बहुप्रतीक्षित असे डार्कमोड फिचर Whatsapp पवर सुरू झाले आहे. काही युजर्सनी या फिचरचा वापरही सुरू केलाय. हे डार्कमोड फिचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी Whatsappची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती Whatsapp बीटा अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या 

 

 Whatsapp युजर्ससाठी गुड न्यूज आहे. बहुप्रतीक्षित असे डार्कमोड फिचर Whatsapp पवर सुरू झाले आहे. काही युजर्सनी या फिचरचा वापरही सुरू केलाय. हे डार्कमोड फिचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी Whatsappची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती Whatsapp बीटा अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या 

नवी दिल्लीः अतुरतेने वाट पाहात असलेल्या Whatsapp युजर्ससाठी गुड न्यूज आहे. बहुप्रतीक्षित असे डार्कमोड फिचर Whatsapp वर सुरू झाले आहे. काही युजर्सनी या फिचरचा वापरही सुरू केलाय. हे डार्कमोड फिचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी Whatsappची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती Whatsapp बीटा अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने दिलीय. हे डार्कमोड फिचर अँड्राइड बीटा व्हर्जनवर काही दिवसांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलंय.

डार्कमोडसोबतच व्हॉट्सअॅप युजर्स डिलीट मेसेज फिचरच्याही प्रतीक्षेत आहेत. आपण पाठवलेला मेसेज युजर्सना ऑटोमेटीक डिलीट करता येणार आहेत. युजर्स आपला मेसेज ऑटोमेटीक डिलीट करण्याचा कालावधी ठरवू शकणार आहेत. सुरुवातीला कंपनी अँड्रॉइड युजर्ससाठी हे फिचर आणणार आहे.

 iOS वरील युजर्सना अजून वाट पाहावी लागले. iOS वरील फिचर डेव्हलप केले जात आहे. iOSवरील डार्कमोड फिचरही हळूहळू अंमलात आणले जाईल. पण सध्या ते डेव्हलप होत आहे आणि तात्पुरते म्हणजे अनस्टेबल स्वरुपात आहे. iOSवरील डार्कमोडमध्ये सुधारणेची गरज आहे, असं WABetaInfo ने ट्विटमध्ये म्हटलंय.

Whatsapp डार्कमोड फिचर सध्या काही मोजक्या युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात आणि मर्यादित युजर्सना हे फिचर सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व युजर्सना हे फिचर उपलब्ध करून देण्यापूर्वी कंपनी त्याची सर्व स्तरावर चाचणी करत आहे. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दुरुस्त करण्यात येणार आहे. डार्कमोड हे फिचर कायम स्वरुपी कधीपर्यंत उपलब्ध करून दिले जाईल, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

WebTittle :whatsapp dark mode feature


संबंधित बातम्या

Saam TV Live