WhatsApp चे नवं ‘Frequently Forwarded फिचर लाँच

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मुंबई : WhatsApp वापराचे प्रमाण जगभरात वाढले आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात WhatsApp चे युजर्स आहेत. WhatsApp ने आता एक नवे फीचर लाँच केले आहे. ‘Frequently Forwarded’ असे या नव्या फीचरचे नाव आहे. 

मुंबई : WhatsApp वापराचे प्रमाण जगभरात वाढले आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात WhatsApp चे युजर्स आहेत. WhatsApp ने आता एक नवे फीचर लाँच केले आहे. ‘Frequently Forwarded’ असे या नव्या फीचरचे नाव आहे. 

‘Frequently Forwarded’ या नव्या फीचरच्या माध्यमातून एक मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला, हे आता सहजपणे समजू शकणार आहे. ‘Frequently Forwarded’ या फीचरवर गेल्या काही दिवसांपासून WhatsApp कंपनीकडून काम करण्यात येत होते. त्यानंतर आता हे फिचर लाँच करण्यात आले आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून जर एखाद्या मेसेजला 5 पेक्षा अधिकवेळा फॉरवर्ड केल्यास त्यावर लेबल दिसणार आहे.

तसेच WhatsApp च्या मते एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला, याची माहिती End-To-End Encryption राहील याचा अर्थ ही माहिती इतर कोणालाही पाहता येणार नाही. 

दरम्यान, भारतात मोठ्या प्रमाणात FakeNews व्हायरल केल्या जातात. WhatsApp च्या माध्यमातून याचे प्रमाण आणखी वाढले आहे. याला आळा बसावा म्हणून WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणली. 

WebTitle : whatsapp launched its new feature called frequently forward 

संबंधित बातम्या

Saam TV Live