अहो सांगताय काय?... चक्क नवऱ्यामुलानेच गळ्यात घातले मंगळसूत्र

अश्विनी जाधव - केदारी
शनिवार, 27 मार्च 2021

स्त्री पुरुष समानता ही फक्त पुस्तकात शिकण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्षात आमलात येण्याची गरज आहे, स्त्री पुरुष समानता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा धाडसी निर्णय  शार्दूल आणि तनुजा या जोडप्याने घेतला.

पुणे : आतापर्यंत अनेक विवाहित स्त्रियांना आपण मंगळसूत्र घातल्याचं पाहत आलोय, पण एखाद्या पुरुषानेच गळ्यात आपल्या बायकोच्या नावे मंगळसूत्र घातलं असेल तर? आश्चर्य वाटलं ना?  पण हो, सध्या या नवरदेवाचा विषय चांगलाच व्हायरल होतोय. When Bride groom wears Mangalsutra instead of Bride

स्त्री पुरुष समानता ही फक्त पुस्तकात शिकण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्षात आमलात येण्याची गरज आहे, स्त्री पुरुष समानता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा धाडसी निर्णय  शार्दूल आणि तनुजा या जोडप्याने घेतला.

शार्दूल मुलाचा इस्लामपूर चा तर तनुजा पुण्याचीच. दोघेही उच्चशिक्षित असून नामांकित कंपन्यांमध्येनोकरी करतात, शार्दूल आणि तनुजा कदम यांचं लग्न 24 डिसेंबरला झालं.  पण या लग्नात (Wedding) नवऱ्या मुलीप्रमाणे नवरदेवाने देखील मंगळसूत्र घातल्याने हा लग्नसोहळा चर्चेत राहिला. त्यात लग्नानंतर काही महिन्यांनी शार्दूल ने सोशल मीडियावर (Social Media)लग्नाचे काही फोटोज शेअर केले आणि त्याच्या मंगळसूत्र आणि हातात काळ्या मण्यांचे ब्रेसलेट घालण्याच्या कृतीमुळे पुन्हा चर्चेला उधाण आले. स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी फक्त स्त्रियांनीच का मंगळसूत्र घालायचं पुरुष म्हणून मी देखील बायकोच्या नावाने मंगळसूत्र घालू शकतो , फक्त याच कृतीने समानता येईल असे नाही पण हा पुढाकार ही महत्वाचा ठरु शकेल या भावनेतून शार्दूल ने मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला.

मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा  मंगळसूत्र म्हणजे आत्मा एक होणारा शुभ धागा. फक्त स्त्रीनेच मंगळसूत्र घालावं हा समाजाचा नियम आहे, पण आपल्या पूर्वजांकडे बघितल्यावर आपल्याला कल्पना येईल की पुरुष ही दागदागिने घालतच होते, इंग्रजांच्या प्रभावामुळे आपण आपली मूळ परंपरा सोडली, आणि कुठल्याच शास्त्रात पुरुष उच्च आणि स्त्री नीच असे मांडलेले नाही. ते नियम आपण तयार केलेत त्यामुळे नात्याचं प्रतीक म्हणून बायको मंगळसूत्र घालत असेल तर मी का घालू नये असे मला वाटले असं शार्दूल सांगतो.When Bride groom wears Mangalsutra instead of Bride

विवाह सोहळ्यात शार्दूलच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले होते, मात्र सोशल मीडियावर फोटो टाकल्या नंतर अनेक बऱ्या वाईट कमेंट्स आल्या, फक्त मिरवण्यापूरती शार्दूल चा हा निर्णय नसून सहजीवनाची प्रत्येक जबाबदारी आम्ही दोघे वाटून घेतो, हे देखील महत्वाचे आहे, लोक काय म्हणतात या गोष्टीला आमच्यात महत्व नाही, आम्हाला काय वाटते हे महत्वाचे आहे, 

समाजाची भीती न बाळगता शार्दूल आणि तनुजाने उचललेलं हे पाऊल, अनेकांसाठी आदर्श ठरणारं आहे, पती पत्नीच्या सुरेल नात्याची सुरवातच एका अनोख्या पुढाकाराने झालीय ज्याची चर्चा सर्वत्र रंगते आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live