जेव्हा जिल्हाधिकारी संतापतात!

अभिजीत घोरमारे
सोमवार, 7 जून 2021

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नियम मोडणाऱ्या दुकानदारावर भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली. 

भंडारा -  भंडाऱ्यांचे जिल्हाधिकारी संदीप कदम व पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी अडीच महिन्याच्या कालावधी नंतर नुकतेच अनलॉक झालेल्या भंडारा शहराची पहाणीसाठी जिल्हाचे दोन्ही मोठे अधिकारी यांनी रुट मार्च काढला होता. 

यावेळी अनेक दुकाने प्रतिष्ठानाची त्यांनी स्वत: पहाणी केली. यावेळी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नियम मोडणाऱ्या दुकानदारावर भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली. 

हे देखील पहा - 

 

यावेळी तब्बल 11 दुकानावर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी स्वत: कारवाई केली. यावेळी 11 हजार 300 रुपयाचा दंड ही नगर परिषदद्वारे वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या अचानक  भेटीने अनेक दुकानादारांची यावेळी धड़की भरली आहे. 

मुलुंडमध्ये पॉश सोसायटीनं केली वीजचोरी, रक्कम ऐकून थक्क व्हाल

राज्य सरकारने पहिल्या फ्रेजमध्ये 18 जिल्हाला अनलॉक केले आहे. त्यात भंडारा जिल्हाचा देखील समावेश केला आहे. लेवल तीनमध्ये असलेल्या भंडारा जिल्हाला काही अंशी अनलॉक करण्यात आले आहे. यावेळी अनलॉकच्या स्थितिची संपूर्ण जबाबदारी राज्यसरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे त्यांची तपासणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तेव्हा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live