प्रियकरासाठी पळून जाण्यासाठी कारणीभूत ठरलं अंड 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

गोरखपूर : दररोज अंड खायला न मिळत असल्याने एका महिलेने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळ काढल्याची आश्चर्यजनक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे घडली आहे. 

गोरखपूर : दररोज अंड खायला न मिळत असल्याने एका महिलेने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळ काढल्याची आश्चर्यजनक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर जिल्ह्यातील कंपेरगंज भागात ही घटना घडली आहे. महिलेनं प्रियकारासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेचा पती हा रोजंदारीवर काम करुन घर चालवत होता. त्याच्या पत्नीला रोज अंड खाण्याची सवय लागली होती. पण, अखेर त्याला रोज अंड आणायला परवडत नव्हतं त्यामुळे त्याने पत्नीला अंड खाण्यास मनाई केली. अंड न खायला मिळाल्याने वैतागलेल्या महिलेने चार महिन्यांनंतर अखेर घरातून पळ काढला. या आधीही महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र काही दिवसांत महिला परत आली मात्र यावेळी अंड्यावरुन वाद झाल्यानंतर तिने पुन्हा घरातून पळ काढला.

'मला माझा नवरा रोज अंड खायला देत नाही'. अशी महिलेनं पतीची रितसर पोलिसात तक्रार दाखल केली. शनिवारी रात्री महिलेचे पतीसोबत अंड खाण्यावरुन भांडण झाले. त्या भांडणानंतर महिलेनं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. तर पतीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला. तेव्हा प्रियकराच्या घरालाही कुलूप होते. महिला आणि प्रियकर पळून गेल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली. पोलिस अधिक तपास करत आहेत. अंड खाण्याची आवड असल्यामुळे त्याचा फायदा प्रियकराने घेतल्याचा आरोप पतीने केला आहे.

Web Title: When husband could not feed eggs so wife escaped with lover


संबंधित बातम्या

Saam TV Live