जेव्हा पोलिसच बनला चोर... नोकरीच्या आमिषाने मोबाईल, गाड्यांची चोरी

साम टीव्ही
रविवार, 15 नोव्हेंबर 2020
  • कधीकाळचा पोलिसच बनला चोर
  • नोकरीच्या आमिषाने मोबाईल, गाड्यांची चोरी
  • लाखो रुपयांच्या मोबाईल, गाड्यांवर डल्ला

पुणे : जो एकेकाळी चोरांना पकडायचा आणि तुरूंगात डांबायचा. पण आता त्याच्याच हातात बेड्या पडल्यायत. तेही चोरीच्या आरोपांमध्ये. एकेकाळी खाकी वर्दी घालणारा आता कसा बनलाय चोर? वाचा...

तोंडाला काळं कापड लावलेला हा जो इसम दिसतोय त्याचं नाव आहे, विलास जावळे. तो एकेकाळी पोलिस होता. एकेकाळी तोही आरोपींना असाच पकडायचा. पण, नैतिकता सोडली आणि हातात बेड्या पडल्या. त्याचं झालंय असं की, हा पठ्ठ्या लोकांना रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवून बोलवायचा. आणि सावज टप्प्यात आलं की त्याचे मोबाईल आणि गाडी हातोहात गायब करायचा. अनेक तरुणांचे मोबाईल, गाड्या चोरल्याच्या तक्रारी आल्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच. आणि त्याच्याकडून तब्बल 8 गाड्यांसह 11 स्मार्टफोन जप्त केलेयत.

1985 साली खाकी वर्दीत सेवा बजावणारा विलास जावळे वर्षभरातच नोकरी सोडून चोऱ्या-माऱ्या करू लागला. पोलिसांचं ट्रेनिंग घेतल्याने वावरण्यातली, बोलण्यातली लकब त्याला कळली होती. त्यामुळे त्याच्या बोलण्याला लोक भुलायचे. पण, पोलिसांनी त्याला वेळेतच तुरूंगात टाकलं ते बरं केलं. नाहीतर, त्याने आणखी कितीजणांना गंडा घातला असता याची कल्पनाच न केलेली बरी.


संबंधित बातम्या

Saam TV Live