कधी होणार कोरोनाचा संपूर्ण नायनाट? वाचा, जागतिक आरोग्य संघटनेनं नेमकं काय सांगितलं?

साम टीव्ही
शनिवार, 22 ऑगस्ट 2020
  • कोरोनाचा संपूर्ण नायनाट कधी होणार?
  • किती वर्ष कोरोनाचं संकटाशी झुंजत राहायचं?
  • जागतिक आरोग्य संघटनेनं नेमकं काय सांगितलं?

संपूर्ण जगातील प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न. कोरोनाचा नायनाट कधी होणार. याच प्रश्नाचं उत्तर WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं दिलंय. पाहूयात WHO नं काय म्हटलंय आणि कधी होणार कोरोनाचा खात्मा...

गेले सहा महिने जगभरात कोरोनाने थैमान घातलंय. जगातला प्रत्येक कोपरा न कोपरा कोरोनाने पिंजून काढलाय. त्यामुळे हा कोरोनाचा राक्षस मरणार कधी आणि हे संकट नेमकं संपणार कधी ? असा प्रश्व प्रत्येकालाच पडलाय. अशा सगळ्या संभ्रमाच्या काळात WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचा खात्मा दोन वर्षांत होणार असल्याचा आशावाद व्यक्त केलाय.

कोरोनाचा खात्मा कधी होणार?
WHO ने सागितल्यामुसार कोरोनाचा संपूर्ण नायनाट व्हायला पुढची दोन वर्ष लागतील. हा आशावाद मांडताना WHO ने म्हटलंय की, 1918 साली स्पॅनिश फ्लूची साथ आली होती. ती साथ संपण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला होता. 1918 सालच्या तुलनेत सध्या आपण वैज्ञानिकदृष्ट्या अधिक सक्षम आहोत. त्यामुळे आपण 2 वर्षांत कोरोनावर मात करू शकतो.
कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरात युद्ध पातळीवर सुरूय. त्यातच आता WHO ने केलेला दावा आशादायक आहे.

कोरोनामुळे भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेतलेत. त्यामुळे प्रत्येकजण लसीची वाट बघतोय. त्यामुळे त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनं केलेला दावा खरा ठरावा आणि लवकरात लवकर लसीचा शोध लागावा अशीच आशा प्रत्येकजण करतोय.


संबंधित बातम्या

Saam TV Live