धार्मिक स्थळं कधी सुरु होणार? वाचा,मोठ्या देवस्थानांची काय स्थिती असेल?

साम टीव्ही
सोमवार, 8 जून 2020

 

  • राज्यातील मंदिरं दर्शनासाठी बंदच राहणार
  • भाविकांना घरातूनच करावा लागणार देवाचा धावा

लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद असलेली देशातील धार्मिक स्थळं पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. राज्यात मात्र धार्मिक स्थळं उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 
महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानांची काय स्थिती असेल, पाहूयात एक रिपोर्ट...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून देशभरातील बंद असलेली विविध मंदिरं आज पासून खुली करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलीय. मात्र राज्यातली देवस्थानं तुर्तास तरी बंदच असणार आहेत. 

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरची विठू माऊली...आषाढी एकदशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुरात येत असतात. विठूरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी जमलेली असते 
मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी 

यंदा पंढरपूरची पायी वारी असणार नाही. 

17 मार्च पासून बंद असलेलं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 जुलैपर्यंत बंदच असेल, पंढरपूर शहर आणि परिसरातील सुमारे 450 मठ आणि धर्मशाळा पुढचे दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

वारी काळात भाविकांनी पंढरपुरात येवू नये असं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. 
शिर्डीचे साईबाबा म्हणजे देशातील तमाम साईभक्तांचं श्रद्धास्थान...दररोज इथं शेकडो भाविक साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. 

मात्र कोरोनाच्या संकटामुळे पुढील आदेश येईपर्यंत शिर्डीचं साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असेल. 17 मार्चपासून साई मंदिर बंद ठेवण्यात आलंय.

 साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर...
कोरोना संकटामुळे तुळजाभवानी मंदिर अडीच महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.

तुळजापूरजवळच्या सोलापुरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यानं मंदिर काही दिवस बंदच असेल. 

30 जूनला मंदिर उघडण्याचा अंदाज व्यक्त होतोय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दररोज भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र कोरोना संकटामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय. 

राज्य सरकारकडून पुढील आदेश मिळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंदच असेल. 

परवानगीनंतर सोसश डिन्स्टसिंगचे नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल
 कोरोना संसर्गाचा फटका राज्यातल्या देवस्थानांनाही बसलाय. मंदिरं बंद असल्यानं छोटे मोठे दुकानदार तसच व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तर कोरोनाचं संकट टळेपर्यंत भाविकांना आता घरातूनच देवाचा धावा करावा लागणारंय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live