रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार? वाट बघतोय रिक्षावाला.. ( पहा व्हिडिओ )

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

मुख्यमंत्र्यानी लॉकडाउन मध्ये रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत अजून देखील रिक्षा वाल्यानां मिळालीच नाही, त्यामुळे रिक्षावाल्यान वरती सरकारी मदतीची वाट पाहण्याची वेळ आली आहे

मुंबई : मुख्यमंत्र्यानी लॉकडाउन Lockdown मध्ये रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत अजून देखील रिक्षा चालकांना मिळालीच नाही, त्यामुळे रिक्षावाल्यान वरती आता सरकारी मदतीची वाट पाहण्याची वेळ आली आहे. When will the rickshaw pullers get one and a half thousand help from the government

रिक्षा चालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार आहेत. १५ दिवसानंतरही रिक्षा चालक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या आश्वासनांचे काय झाले. राज्यात लॉकडाउन जाहीर करताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून १५ दिवस उलटल्या नंतर रिक्षा चालकांच्या बँक Bank खात्यात दीड हजार रुपये आलेले नाहीत. 

संचारबंदीमुळे Curfew रिक्षा चालकांचा व्यवसाय राहिलेला नाही. त्यात सरकारने दिलेला आश्वासन देखील पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रिक्षा चालकांच्या चिंतेत भर पडली आहे. सरकारने जे अनुदान घोषित केलेलं आहे. ते अपूर आहे, सरकाने किमान ५ ते ७ हजार रुपये अनुदान प्रत्येक रिक्षा चालकांस द्यावे, असे रिक्षा चालकांची मागणी आहे. When will the rickshaw pullers get one and a half thousand help from the government

बोलतो ते करून दाखवतोच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच म्हणतात. रिक्षा चालकांना दिलेला वचन मुख्यमंत्री पाळतील का, अशी चर्चा रिक्षा चालकांनमध्ये सुरु आहे. १५ दिवसांच्या लॉकडाउन नंतर पुन्हा १५ दिवसांचे  लॉकडाउन लावण्यात आले आहे. या १५ दिवसात राज्य शासनाने रिक्षा चालकांना दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते, तेच दीड हजार रुपये अजून सुद्धा रिक्षा चालकास मिळाले नाहीत.

ही पैसे कसे मिळवायचे, काय मिळवायचे हे देखील या रिक्षा चालकांना माहिती नाही. त्यामुळे या मोठ्या अडचणी रिक्षा चालकांच्या समोर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर ही पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत. अशी मागणी रिक्षा चालक करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav  
 


संबंधित बातम्या

Saam TV Live