वाचा, कधी उघडणार राज्यातली मंदिरं? मंदिरांबाबत महाराष्ट्राला वेगळा नियम का?

साम टीव्ही
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

 

  • कधी उघडणार राज्यातली मंदिरं ?
  • मंदिरांबाबत महाराष्ट्राला वेगळा नियम का?
  • मंदिरं उघडण्यासाठी देवस्थान समित्या आक्रमक 

गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होतोय. पण मंदिर उघडण्यास अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. मंदिरं उघडण्यासाठी आता देवस्थान समित्याच आक्रमक झाल्यायेत. 

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर...शिर्डीतलं साई मंदिर...पंढरपूरचं विठ्ठल मंदिर...तुळजापूर, अक्कलकोट, नाशिक अशी सगळीकडचीच मंदिरं गेल्या सहा महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद आहेत. अनलॉक - 3 नंतर राज्यातील बरेचसे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आलेत. राज्यातील दारूची दुकानं सुरू झाली. भाजी मार्केटपासून छोट्या मोठ्या कारखान्यांपर्यंत, उद्योगांची चक्र सुरू झाली..मंग सरकारला मंदिरांचंच  वावडं का? असा सवाल आता देवस्थान समित्याच विचारू लागल्या आहेत. मंदिरात दर्शनाला, भजन, किर्तनाला अद्याप परवानगी का नाही ? अशी विचारणा होतीय. मंदिरं सुरू करण्याबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी देवस्थान समित्यांकडून होतीय. 

मंदिरं बंद असल्यानं गेल्या 6 महिन्यांपासून उप्तन्नाचे सारे स्त्रोत बंद झाले आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक असते. लॉकडाऊनमुळे साई संस्थानचं जवळजवळ 1 हजार कोटींचं नुकसान झालंय. राज्यातील इतर मंदिरांचीही देखील हीच स्थिती आहे. मंदिरांचं व्यवस्थापन, देखभाल दुरूस्तीचा खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या दुकादारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलीय. य़ाशिवाय भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न वेगळाच...त्यामुळे आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नका..मंदिरं सुरू करा अशी आर्जव देवस्थान समित्या करतायेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live