उद्या कुठे असेल मेगाब्लॉक?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 28 डिसेंबर 2019

मुंबई : पश्चिम मार्गावर शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर येथे लोकल थांबणार नाहीत. हार्बर मार्गावर काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रे दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत रद्द करण्यात येतील. चुनाभट्टी/वांद्रेहून सीएसएमटीकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत, सीएसएमटी/वडाळा रोडहून वाशी/बेलापूर/पनवेल दिशेकडे सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ पर्यंत लोकलसेवा नसेल. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडील लोकल सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ पर्यंत रद्द करण्यात येतील. सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगाव दिशेकडे सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ पर्यंत तसेच गोरेगाव/वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत लोकल नसतील. पनवेल ते कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारऐवजी शनिवार २८ डिसेंबर रोजी रात्री वसई रोड ते विरारदरम्यान रात्रकालीन जम्बोब्लॉक असेल. मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा जम्बोब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान विरार दिशेकडील सर्व धिम्या लोकल विरार ते वसईदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील.

माटुंगा ते मुलुंडदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवार, २९ डिसेंबरला सकाळी ११.२० ते ३.५० पर्यंत ब्लॉक असेल. माटुंग्याहून कल्याण दिशेकडील धिम्या लोकल जलद मार्गावर धावतील. त्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे थांबणार नाहीत.

Marathi News ::  Where is tomorrow's megablock

संबंधित बातम्या

Saam TV Live