दिवाळीत कोणते शॆअर घ्याल? 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

 

यंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. अशाच काही निवडक शेअरवर एक नजर.

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारात मुहूर्ताचे व्यवहार झाले आणि त्यापाठोपाठ आता नव्या संवत्सराची (२०७६) सुरवातही झाली आहे. यंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. अशाच काही निवडक शेअरवर एक नजर.

 

यंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. अशाच काही निवडक शेअरवर एक नजर.

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारात मुहूर्ताचे व्यवहार झाले आणि त्यापाठोपाठ आता नव्या संवत्सराची (२०७६) सुरवातही झाली आहे. यंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. अशाच काही निवडक शेअरवर एक नजर.

अ) आनंद राठी -
१) रिलायन्स इंडस्ट्रीज, सध्याचा भाव - रु. १४२८.२५ (उद्दिष्ट - रु. १६१०) - ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. मागील सहा वर्षांत ‘रिलायन्स’चा महसूल सातपटीने, तर नफा १४ पटीने वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत ११,२६२ कोटी रुपयांचा दणदणीत नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात १८.३७ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत महसूल ४.८ टक्‍क्‍यांनी वाढून १,६३,८५४ कोटी रुपयांवर पोचला आहे.

२) भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स (बीईएल), सध्याचा भाव - रु. ११६.१५ (उद्दिष्ट - रु. १३५) - भारतीय लष्कराला विविध उत्पादनांचा पुरवठा करणारी ही महत्त्वाची कंपनी आहे. अलीकडेच भारतीय हवाई दलाकडून जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या ‘आकाश’ क्षेपणास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ९० अब्ज रुपयांच्या ऑर्डर याआधीच मिळाल्या आहेत.

३) हिंदुस्थान युनिलिव्हर, सध्याचा भाव - रु. २१४५.१० (उद्दिष्ट - रु. २४२२) - ही देशातील सर्वांत मोठी ‘एफएमसीजी’ कंपनी आहे. कंपनीचे बाजारपेठेत मजबूत स्थान आहे. दुसऱ्या तिमाहीअखेर कंपनीच्या महसुलात ६.७ टक्के वाढ झाली आहे, तर करपश्‍चात नफ्यात २१ टक्के वाढ झाली आहे. मॉन्सून चांगला झाला असल्यामुळे कंपनीच्या विक्रीला अनुकूल स्थिती असणार आहे.

ब) एचडीएफसी सिक्‍युरिटीज -
१) बजाज ऑटो, सध्याचा भाव - रु. ३१३३.७५ (उद्दिष्ट - रु. ३४४७) - ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची दुचाकी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाची तीनचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे अस्तित्व ७९ पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला १४०२ कोटींचा नफा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात २२ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. लाभांश आणि करापोटी २०७२ कोटी भरल्यानंतरदेखील सप्टेंबरअखेर कंपनीकडे १५,९८६ कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती कंपनीने दिलेली आहे.  

२) अल्ट्राटेक सिमेंट, सध्याचा भाव - रु. ४१९९ (उद्दिष्ट - रु. ४९८०) - भारत ही जगातील सिमेंटसाठीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अल्ट्राटेक सिमेंटचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा २१ टक्के आहे. कंपनीची वार्षिक ११.७३५ कोटी टन ग्रे सिमेंट उत्पादनाची क्षमता आहे.

३) सुदर्शन केमिकल, सध्याचा भाव - रु. ३९८ (उद्दिष्ट - रु. ४६०) - पिगमेंट क्षेत्रातील जगातील चौथ्या क्रमांकाची, तर भारतातील सर्वांत मोठी कंपनी. भारतातील पिगमेंट व्यवसायात ३५ टक्के हिस्सा. ४०० पेक्षा जास्त उत्पादने. दरवर्षी २५-३५ उत्पादने गरजेनुरूप बाजारात आणण्याचे व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे.

क) सिक्‍युरिटीज -
१) कोटक महिंद्रा बॅंक, सध्याचा भाव - रु. १५८८.६० (उद्दिष्ट - रु. १८००) - बॅंकेची मालमत्तेची गुणवत्ता स्थिर स्थितीत (स्टेबल क्वॉलिटी) आहे. बॅंकेच्या कर्ज वितरण व्यवसायात वाढ अपेक्षित आहे. नॉन बॅंकिंग क्षेत्रातील बॅंकेच्या व्यवसायाची वाढ आणि नफ्याचे प्रमाण उत्तम आहे.

२) एशियन पेंट्‌स, सध्याचा भाव - रु. १७९५.५० (उद्दिष्ट - रु. १९३५) - देशातील सर्वांत मोठी आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाची पेंट कंपनी. डेकोरेटिव्ह पेंट्‌सच्या क्षेत्रातील व्यवसायवाढीला मोठी संधी. रिअल इस्टेटमधील मंदीचा प्रत्यक्ष परिणाम मर्यादित. पेंट व्यवसायातील इतर अनेक संधी उपलब्ध. टिअर-२, टिअर-३ शहरांमध्ये व्यवसायवाढीची मोठी संधी.

३) एचसीएल टेक्‍नॉलॉजीज, सध्याचा भाव - ११३४.०५ (उद्दिष्ट - रु. १२५०) - नव्या व्यवसायाच्या संधीमुळे महसुलात वाढ होण्याची चिन्हे. ‘आयबीएम’बरोबरच्या भागीदारीमुळे व्यवसायात वाढ आणि महसुलात वाढ होणार. कंपनीच्या ‘मार्जिन’मध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा.

Web Title: Which shares do you take in this diwali


संबंधित बातम्या

Saam TV Live