बारामतीचा उमेदवार मोदी, शहा की देवेंद्र?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तुमचा उमेदवार कोण, मोदी, शहा की देवेंद्र असा सवाल करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज पुण्यात होते. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, की मागच्या वेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्या, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागांवर लढणार आहोत. शिवाय या वेळी गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा जास्त जिंकू आणि ती एक जागा बारामतीची असेल. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी उपरोक्त आशयाचे ट्विट केले आहे.

Web Title: Who is the Candidate of Baramati Modi Shah or Devendra

संबंधित बातम्या

Saam TV Live