जे गुरू अण्णा हजारेंचे होऊ शकले नाहीत, ते कोणाचे कसे होतील : नड्डा 

जे गुरू अण्णा हजारेंचे होऊ शकले नाहीत, ते कोणाचे कसे होतील : नड्डा 

नवी दिल्ली : जे गुरू अण्णा हजारेंचे होऊ शकले नाही, ते कोणाचे कसे होतील ? अशी बोचरी टीका भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केली आहे. 

दिल्लीत पोस्टरबाजी करणारे नव्हे, तर डबल इंजिन असणारे भाजपचे सरकार हवे, असेही ते म्हणाले. ट्‌विटरवरून नड्डा यांनी आम आदमी पक्षावर टीका करत लोकपाल विधेयक, स्वराज या घोषणेपासून घूमजाव केल्याचा आरोप केला. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरू लागला आहे. सोशल मीडियातूनही नेते मैदानात उतरले असून, प्रतिस्पर्ध्यांवर आरोप करत आहेत. भाजपचे नवे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज ट्विटरवरून आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर प्रश्‍नांच्या फैरी झाडल्या आहेत. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत लोकपाल विधेयक नाही, स्वराज नाही. दिल्लीत केवळ अहंकाराचे राज्य आहे. स्वराज विधेयक कोठे गेले? 

आपली हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराबाबत ज्यांनी प्रश्‍न केले, त्याला पक्षातून काढून टाकले. दिल्लीत पोस्टरबाजी करणारे नको, तर डबल इंजिनचे भाजप सरकार हवे आहे. जे गुरू अण्णा हजारेंचे होऊ शकले नाही, ते कोणाचे कसे होतील?

मुख्यमंत्र्यांला कक्षेत आणणारे लोकपाल विधेयक आणणार होते. या लोकपालच्या माध्यमातून रामराज्य आणायचे होते, कोठे गेले लोकपाल विधेयक ? असा सवाल त्यांनी केला. या वेळी लोकपालच्या मुद्‌द्‌यावरून ऍडमिरल रामदास यांना काढून टाकल्याचा उल्लेख नड्डा यांनी केला. 

WebTittle :: Who could not be Guru Anna Hazare, how will they be: Nadda

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com