कोरोनाबाबत WHOने जगाला दिली गुड न्यूज,आणि सोबतच बॅड न्यूज, वाचा सविस्तर

साम टीव्ही
शनिवार, 27 जून 2020
  • कोरोनाबाबत WHOने जगाला दिली गुड न्यूज,आणि बॅड न्यूज
  • एक ते दीड वर्षात कोरोनाची लस विकसित होणार
  • तर कोरोनाची दुसरी लाट घेणार लाखोंचा जीव

कोरोनाचा कहर कधी थांबणार? कोरोनावर लस कधी येणार असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनाला पडले आहेत. कोरोनासंदर्भात WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं एक गूड न्यूज दिलीय तर लगोलग बॅड न्यूज सुद्धा दिलीय. काय आहेत या दोन्ही बातम्या...पाहा...

कोरोनाच्या संकटानं सारं जग त्रासलंय. अखेर हा कहर कधी संपणार हाच प्रश्न प्रत्येकजण एकमेकाला विचारतोय. अशातच WHO नं एक दिलासादायक बातमी दिलीय. डब्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी लवकरच कोरोनाची लस विकसीत होत असल्याची माहिती दिलीय. येत्या एक ते दिड वर्षात ही लस विकसीत होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

सध्या कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात 200 प्रयोग केले जात आहेत. तर 15 मानवी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर एक्स्ट्रा झनेका ही कंपनी आहे. अनेक देशात त्यांनी संशोधनाचे दोन टप्पे पुर्ण केले आहेत. तर तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. तर मॉडर्ना कंपनीसुध्दा संधोधनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करेल अशी माहिती शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. तर भारतातील सीरम इन्ट्सीट्यूटनं लस संशोधनासाठी 750 कोटी गुंतवले आहेत. 

ही झाली लसीबाबतची सकारात्मक बातमी आता दुसरी बातमी आहे सर्वांना धक्का देणारी लवकरच कोरोनाची दुसरी लाट येणार असून त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती WHOनं व्यक्त केलीय. WHOचे असिस्टंट डायरेक्टर रनीरी गुएरा यांनी स्पॅनिश फ्लूचा दाखला देत ही भीती व्यक्त केलीय. 100वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूनं कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला होता. स्पॅनिश फ्लू आणि कोव्हिड या दोघांमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य असल्याचं रनीरी गुएरा यांचं म्हणणं आहे आतापर्यंत जगभरात 98 लाख लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर जवळपास 5 लाख लोकांचा बळी गेलाय. त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी खुपच कठीण आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकानं आपली आणि कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live