धक्कादायक! कोरोना कधीच संपणार नाही! WHOचा इशारा...

साम टीव्ही
गुरुवार, 14 मे 2020
  • WHO ने दिला गंभीर इशारा
  • WHO म्हणतं, कोरोना कधीच संपणार नाही!
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानं खळबळ

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनासंबंधी एक गंभीर इशारा दिलाय. कोरोना कधीच संपणार नाही, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय. काय म्हणण्यात आलंय एका महत्त्वाच्या अहवालात?

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अजून कोणतीही लस तयार झालेली नाही. अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी जगभर लॉकडाऊन उठवण्यासंबंधी हालचाली सुरु आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनं एक अत्यंत गंभीर इशारा दिलाय. कोव्हिड-19 आपल्यासोबत मोठ्या काळासाठी राहणार आहे, कदाचित कोरोना कधीच या जगातून जाणार नाही, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.

कोरोना एखाद्या स्थानिक आजारासारखा रुप घेऊन माणसासोबत राहिल, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. मलेरिया, डेंग्यु, स्वाईन फ्लू किंवा एचआयव्ही या रोगांप्रमाणे कोरोना मानवजातीसोबत दीर्घ काळ राहिल, अशी भीतीही वर्तवण्यात आलीय. कोरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक काळजी घेणं, हीच काळाची गरज आहे
एकंदरीतच माणसाला आता कोरोनासोबत जगायची सवय करावी लागेल, असं म्हणायला वाव आहे. 

Web Title - WHO SAYS corona naver end


संबंधित बातम्या

Saam TV Live