काम करत राहा, पक्ष तुमचा नक्की विचार करेल - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांची आज (रविवार) राष्ट्रवादीने बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी नेत्यांना स्पष्ट भाषेत पक्षाची भूमिका सांगितली. दरम्यान, शरद पवार पुन्हा एकदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. 

कुणाला पक्ष सोडायचा आहे त्यांनी आताच सोडा : अजित पवार

मुंबई : पराभूत झालेल्या कोणत्याही नेत्याने विधान परिषदेत आमदार होईल, अशी स्वप्ने पाहू नका. कारण, स्वप्ने तुटतात. कुणाला पक्ष सोडायचा आहे, त्यांनी आताच पक्ष सोडा. काम करत राहा, पक्ष तुमचा नक्की विचार करेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांची आज (रविवार) राष्ट्रवादीने बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी नेत्यांना स्पष्ट भाषेत पक्षाची भूमिका सांगितली. दरम्यान, शरद पवार पुन्हा एकदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. 

अजित पवार म्हणाले, की तुम्ही पराभूत झाला असला तरी जनतेच्या संपर्कात राहा. स्वप्नात राहू नका, स्वप्ने तुटतात. अच्छे दिनसारखा तुमचाही भ्रमनिरास होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेपर्यंत कसा जाईल, यासाठी काम करण्यात येईल. शरद पवारांना मानणारा तरुण वर्ग राज्यात मोठा आहे. आपल्याला संघटना मजबूत करायची आहे. यासाठी काम करत राहा पक्ष याचे फळ तुम्हाला नक्की देईल.

Web Title: Who wants to leave the party they should leave now says ajit pawar
 
संबंधित बातम्या

Saam TV Live