सावधान...कोरोनाचा संपूर्ण नायनाट तुर्तास अशक्यच

साम टीव्ही
शनिवार, 11 जुलै 2020
  • सावधान...कोरोनाचा संपूर्ण नायनाट तुर्तास अशक्यच
  • WHOनं जगाला दिला धोक्याचा इशारा
  • जगात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन

बातमी आहे तुम्हा आम्हाला सावध करणारी, सध्याच्या घडीला संपूर्णपणे कोरोनाचा नायनाट होणं अशक्यच आहे. WHOनं तसा धोक्याचा इशाराच साऱ्या जगाला दिलाय.

जगात कोरोना व्हायरसचा फैलाव अतिशय वेगानं होतंय. एकीकडे कोरोनावर लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे संक्रमण रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातायेत. अशातच WHOनं एक धक्कादायक बातमी दिलीय. तुर्तास कोरोना व्हायरसचा संपूर्णपणे नायनाट करणं शक्य नाही असं WHOनं म्हंटलंय. WHOच्या आपात्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रेयॉन यांनी जगात काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असं म्हटंलंय. कोरोनाचं संक्रमण वणव्याप्रमाणे पसरतंय अशी चिंताही त्यांनी व्यक्त केलीय. 

तर दुसरीकडे भारतात या वर्षभरात तरी कोरोनाची लस तय़ार होणं कठीण आहे असं संसदीय समितीनं म्हंटंलय. त्यामुळे 15 ऑगस्टला लस येणाऱ्या हा दावा फोल ठरलाय. एकंदरीतच कोरोनाचा फैलाव रोखण्यात अद्यापही पूर्णपणे यश आलेलं नाही. काही निवडक देश वगळता इतरत्र कोरोनाचा वेग कायम आहे. या शतकातील ही सर्वात भयंकर महामारी असल्याचं WHOनं म्हंटलंय. त्यामुळे आता तुमची सतर्कताच तुमचं आणि कुटुंबांचं रक्षण करू शकते. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live