कोण होणार विधानसभा अध्यक्ष? तीन पक्षांपैकी कोण मारणार बाजी?

साम टीव्ही
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021
  • कोण होणार विधानसभा अध्यक्ष?
  • महाविकास आघाडीत रस्सीखेच?
  • तीन पक्षांपैकी कोण मारणार बाजी?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला किती जोर बैठका काढाव्या लागल्या होत्या हे महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे दुसरा अध्यक्ष कोण ही चर्चा रंगू लागलीय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बैठकांचा सिलसला सुरू होणार असंच दिसतंय. 

काँग्रेसचे डॅशिंग नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुढचा विधानसभा अध्यक्ष कोण याची जोरदार चर्चा सुरू झालीय. 2019 च्या जागावाटपात महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला गेलं होतं. आताही काँग्रेसच्याच कोणत्यातरी नेत्याची वर्णी लागेल असं वाटत असतानाच शरद पवारांच्या वक्तव्याने वेगवेगळे तर्क काढले जातायत.. अध्यक्षपद सर्वांसाठी खुलं असल्याचं सांगत शरद पवारांनी नेहमी प्रमाणे राज्याच्या राजकारणात गुगली टाकलीय.  

 

शिवसेनेला व्हायचंय मुंबईचा कारभारी, मात्र यावरुन आघाडीत बिघाडी, वाचा काय घडलं?

शरद पवारांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. मात्र दुसरीकडे काँग्रेस मधूनच एखादा वरिष्ठ नेता निवडण्यास संदर्भात चाचपणी सुरू आहे, अस कळतंय. अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केलंय.  तर ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात अश्याप्रकारे पटोले यांनी राजीनामा दिल्यानं महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जातंय.. 

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागल्यानं आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसच्या या नावांची चर्चा 

- अमीन पटेल
- संग्राम थोपटे- 
- यशोमती ठाकूर- 
- वर्षा गायकवाड- 

या चार नावांची चर्चा जरी जोरदार सुरू असली तरी अध्यक्षपदी वर्णी लागणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे.

एकंदरीतच नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. या सगळ्यात अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची फोडाफोडीही करण्याची शक्यता नाकारता येत नाही.. त्यामुळे या सगळ्या चर्चेत न पडता काँग्रेसमधलाच सोयीस्कर उमेदवार द्यावा असाही एक मतप्रवास महाविकास आघाडीत आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live