विधानपरिषदेच्या आखाड्यात कोणाची वर्णी लागणार? मुंडे, खडसेंसह नव्याने आलेल्या नेत्यांची भर...

विधानपरिषदेच्या आखाड्यात कोणाची वर्णी  लागणार? मुंडे, खडसेंसह नव्याने आलेल्या नेत्यांची भर...

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त ऩऊ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या निवडणुकीद्वारे विधान परिषदेचे सदस्य होणार आहेत. त्यांच्यासोबत कोणकोण आमदार होणार, याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अपेक्षित असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील अनिश्चितता संपुष्टात आली आहे. या नऊ जागांसाठी 29 मतांचा कोटा आहे. भाजपकडे 115 आमदार असल्याने त्यांचे चार आमदार निवडून येऊ शकतात. महाआघाडीचे 173 आमदार असल्याने त्यांचे पाच आमदार निवडून येतील.

भाजपकडे अनेक इच्छुक आहेत. त्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे या जुन्या नेत्यांसह पक्षाने नव्याने आलेले  विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील या ज्येष्ठ नेत्यांनाही विधान परिषदेेचे वेध लागले आहेत. मोहिते कुटुंबात रणजितसिंह मोहिते यांना संधी मिळू शकते. कारण विजयदादांनी आपण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सोडला नसल्याचे सांगितले आहे. रणजितसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिलेले होते. पश्चिम महाराष्ट्रातून तगडा नेत्याला एखादी जागा पक्षाला द्यावी लागणार आहे. हर्षवर्धन यांना संधी देऊन त्यांना 2024 मध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागण्याचेही संकेत या निमित्ताने देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या पाटलांपैकी की तिसऱ्यालाच संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. 

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागा पुढीलप्रमाणे

भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १ असा रिक्त जागांचा तपशील आहे. 

शिवसेना- १. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद), भाजप- १. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादी- १. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर, काँग्रेस- १. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे).

पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे :  भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३ निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल  {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते. याप्रमाणे निवड होणार असल्याने रिक्त झालेल्या जागांवर भाजपा आपल्या जागा राखेल तर शिवसेनेची एक जागा वाढणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com