मंचरमधील पूर्ण गावाचीच होतेय अँटिजेन टेस्ट 

मंगेश गाडे
बुधवार, 21 एप्रिल 2021

आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती आंबेगाव, उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ आणि ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंचर मध्ये कोरोना चाचणीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे

मंचर: कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील मंचर या गावातील सर्व नागरिकांच्या कोरोना च्या अँटीजन टेस्ट करण्यात येत आहेत. मंचर शहरातील कोरोनाची वाढती  साखळी तोडण्यासाठी आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती आंबेगाव, उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ आणि ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंचर मध्ये कोरोना चाचणीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. The whole village in Manchar has an antigen test

मंचर ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेनुसार गावातील सहा वार्ड मध्ये कोरोना तपासणीची तात्पुरती सहा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सहाही ठिकाणी गावातील नागरिकांची कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना तपासणीच्या या महा मेळाव्याला मंचर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. या सहाही केंद्रांवर कोरोना अँटीजन टेस्ट करण्यासाठी सकाळ पासूनच नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live