मंचरमध्ये गावातील सर्व नागरिकांच्या अँटीजन टेस्ट

मंगेश गाडे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी आंबेगाव तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती आंबेगाव, उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ आणि ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंचर मध्ये कोरोना चाचणीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मंचर: कोरोनाचा Corona हॉट स्पॉट ठरलेल्या पुणे Pune जिल्ह्यातील मंचर Manchar या गावातील सर्व नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट Antigen Test करण्यात येत आहेत. मंचर शहरातील कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी आंबेगाव Ambegaon तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती आंबेगाव, उपजिल्हा रुग्णालय मंचर, प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ आणि ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर मध्ये कोरोना चाचणीचा महामेळावा Convention आयोजित करण्यात आला आहे. The whole village in Manchar has an antigen test

मंचर ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेनुसार गावातील सहा वार्ड मध्ये कोरोना तपासणीची तात्पुरती सहा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सहाही ठिकाणी गावातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना तपासणीच्या या महा मेळाव्याला मंचर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे. या सहाही केंद्रांवर कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यासाठी सकाळ पासूनच नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live