सांगली शहरातील होलसेल भाजीबाजार आजपासून बंद

विजय पाटील
रविवार, 18 एप्रिल 2021

सांगली शहरातील होलसेल भाजीबाजार आजपासून बंद करण्यात आला आहे. बाजारासाठी गर्दी होत असल्याने मनपा प्रशासनाना हा निर्णय घेतला आहे. आता होलसेल बाजार शहरापासून दूर भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

सांगली : शहरातील होलसेल भाजीबाजार आजपासून बंद करण्यात आला आहे. बाजारासाठी गर्दी होत असल्याने मनपा प्रशासनाना हा निर्णय घेतला आहे. आता होलसेल बाजार शहरापासून दूर भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळ मार्केटच्या जागेत आता होलसेल  भाजी बाजार भरणार असून यामुळे शहरातील गर्दी कमी होणार आहे. Wholesale vegetable market in Sangli Closed from Today

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी सुद्धा नाकेबंदी आणि तपासणी सुरू केल्याने शहरात आता हळूहळू गर्दी आणि वायफळ फिरणाऱ्यांवर चाप बसणार आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढती गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंगणगाव खुर्द येथे शेतातून गांजा जप्त

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.. पण विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. Wholesale vegetable market in Sangli Closed from Today

त्यामुळे पोलिसांनी आता पर्यंत ९३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.  तर १८२ वाहने जप्त केली आहेत. तरीही काही ठिकाणी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. विनाकारण बाहेर लोक दिसू लागले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे पोलिसांच्या कडून सांगण्यात येत आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live