हिरेन यांनी का उचललं टोकाचं पाऊल , हिरेन यांना का हवं होतं संरक्षण?

साम टीव्ही
रविवार, 7 मार्च 2021

अंबानीच्या घराबाहेर हिरेन मनसुख यांची कार सापडल्यानंतर सर्वच तपास यंञणांनी त्यांच्यामागे प्रश्नांचा भडीमार सुरू केला होता. त्यामुळे हिरेन हे मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

अंबानीच्या घराबाहेर हिरेन मनसुख यांची कार सापडल्यानंतर सर्वच तपास यंञणांनी त्यांच्यामागे प्रश्नांचा भडीमार सुरू केला होता. त्यामुळे हिरेन हे मानसिक तणावाखाली होते. याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या मृत्यूमागच्या कारणांचा शोध घेतला जातोय. मात्र सततच्या पोलिस चौकशीला कंटाळून हिरेन यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू झालीय. 

अंबानी यांच्या घराबाहेर जेव्हा हिरेन यांची कार सापडली. त्याच मध्यराञी ATS च्या पथकाने रात्री 11 च्या सुमारास हिरेन यांची घरी जाऊन चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाराच्या सुमारास घाटकोपर पोलिसांनी त्यांच्या घरी येऊन चौकशी केली. 26 फेब्रुवारीला मध्यरात्री 2 च्या सुमारास पुन्हा विक्रोळी पोलिसांच्या पथकाने हिरेन यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेलं. 27 फेब्रुवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. पुन्हा 11 वाजता विक्रोळी पोलिसांनी हिरेन यांना चौकशीसंदर्भात फोन केला. त्यानंतर पुन्हा दुपारी 3 वाजता घाटकोपर पोलिसांनी चौकशीसाठी फोन केला. 

त्यानंतर एक दिवस उलटत नाही तोवर 1 मार्चला हिरेन यांना दुपारी 4 वाजता नागपाडा ATS मधून फोन आला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी हिरेन यांना फोन करून चौकशीसाठी पोलिस मुख्यालयात बोलावलं. पोलिस मुख्यालयात पोलिस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनीही हिरेन यांची चौकशी केली. शिवाय इथेच  NIA च्या पथकानेही हिरेन यांची चौकशी केली.

त्यामुळेच हिरेन यांनी आपल्यासह आपल्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली होती. पण अखेर मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live