पुजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला?

SAAM TV
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाणच्या मृत्यूमुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत. पूजाच्या मित्रांनी दिलेल्या जबाबानुसार ती बाल्कनीतून खाली पडली. तर पूजाच्या वडिलांच्या दाव्यानुसार तिनं आत्महत्या केली. नक्की कुणाचा दावा खरा हे पोलिसही सांगायला तयार नाहीत.

पूजा चव्हाण हिची हत्या की आत्महत्या असा प्रश्न आजही कायम आहे. पूजा चव्हाण हीनं पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी साडेतेरा लाखांचं कर्ज घेतलं होतं. ते कर्ज कसं फेडायचं या तणावात ती होती असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे. 

 पूजाच्या खात्यावर कर्ज होतं पण ते फेडण्यासाठी कोणताही तगादा लावला नसल्याचं बँकेनं सांगितलंय. दुसरीकडं पूजानं आत्महत्याच केली असं बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे.

 याप्रकरणात पोलिसांवर कोणताच दबाव असल्याचा आरोप गृहमंत्री  अनिल देशमुखांनी फेटाळलाय.

 दावे प्रतिदावे अनेक केले जातायत. पूजाचा मृत्यू हा अपघात होता की घातपात?... पूजानं आत्महत्या केली तर त्यामागं नक्की कारण काय होतं हे अजून गुलदस्त्यातच आहे.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live