VIDEO | शेतमाल विकायला जात कशाला?

 तुषार रूपनवर सुरेंद्र रामटेके
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

मोठ्या मेहनतीनं, पोटच्या पोरासारखी काळजी घेऊन पिकवलेला  शेतमाल विकायला सरकारी केंद्रावर गेलेल्या शेतकऱ्यांना एका विचित्र अनुभवाला  सामोरं जावं लागतंय..
वर्धा जिल्ह्यातल्या नाफेडच्या तूर विक्री केंद्रावर असाच एक अनुभव शेतकऱ्यांना आलाय..हमीभावानं तुरीची विक्री करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सातबारा, बँक पासबुक, आरकार्ड यासारख्या  दस्तऐवजांसह चक्क स्वतःच्या जातीची नोंद करावी लागतेय...

शेतकरी पीक घेताना जातपात पाहात नाही, मग ही विकताना जातपात पाहायचं कारणच काय, असा सवाल आता केला जातोय..

विरोधी पक्षांनीही या प्रकारावर आता जोरदार टीका सुरू केलीय..आमच्या काळात अशा प्रकारची जातीची नोंदणी केली जात नव्हती, असा टोला विरोधकांनी लगावलाय..

जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाकडे पाहिलं जातं..पण त्यानं पिकवलेला शेतमाल घेताना त्याच्या जातीचा उल्लेख करण्याचं कारणच काय, हा सवाल मात्र सतत उपस्थित होत राहील, हे नक्की...

WebTittle :: Why go to develop commodities?

संबंधित बातम्या

Saam TV Live