पूजा चव्हाण प्रकरणात अजून दाखल गुन्हा का नाही?

SAAM TV
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण प्रकरणात अजून दाखल गुन्हा का नाही?
पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का?
मंत्र्याचं नाव आल्यानं पोलिस दबावात आहेत?

पूजा चव्हाण प्रकरणात अजून दाखल गुन्हा का नाही?
पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का?
मंत्र्याचं नाव आल्यानं पोलिस दबावात आहेत?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात रोज नवनवी माहिती बाहेर येतेय. पूजाच्या घरी पोलिसांना चार दारुच्या बाटल्या सापडल्याची माहिती आहे. त्या बाटल्यांमधील अडीच बाटल्या दारु संपवण्यात आली होती. ज्यावेळी पूजाचा मृत्यू झाला तेव्हा ती दारुच्या नशेत असल्याचा जबाबही त्याच्या मित्रांनी दिल्याचं सांगण्यात येतंय. पण यावर पुणे पोलिस काहीही बोलायला तयार नाहीत.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येतेय. वेगवेगळ्या बाजू समोर येतायत. पण त्यावर पुणे पोलिस काहीही बोलायला तयार नाहीत.

 पूजा प्रकरणात पोलिसांचा तपासाला फारसा वेग नाहीये. त्यामुळं पोलिसांवर दबाव आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्याचं नाव आलं असलं तरी पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय.

या प्रकरणात तक्रारदार नसल्यानं गुन्हा दाखल करण्यात तांत्रिक अडचणी असल्याचं पोलिस खात्यातील सूत्र सांगतायत. एरव्ही कार्यक्षमतेचा डांगोरा पिटणारे पोलिस आता हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन बसलेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live