सहा वर्षांच्या चिमूरडी समोरच आईने केला वडिलांचा खून

साम टीव्ही ब्यूरो
बुधवार, 2 जून 2021

अंगावर काटा आणणारी एक संतापजनक घटना मुंबईतून  समोर आली आहे. दहिसरच्या खान कंपाऊडमध्ये आईनेच आपल्या 6 वर्षाच्या मुली समोर मुलीच्या वडिलांच्या शरीराचे तुकडे केले आणि घरातच खड्डा करुन पुरले.

मुंबई : अंगावर काटा आणणारी एक संतापजनक घटना मुंबईतून  समोर आली आहे. दहिसरच्या खान कंपाऊडमध्ये आईनेच आपल्या 6 वर्षाच्या मुली समोर मुलीच्या वडिलांच्या शरीराचे तुकडे केले आणि घरातच खड्डा करुन पुरले.  या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.  धक्कादायक म्हणजे पत्नीने आपल्या पतीचा खून केला आणि तो गायब आहे याची तक्रारारही पत्नीने दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. (The wife killed her husband) 

याबाबत दहिसरचे पोलिस उपायुक्त झोन 12 चे विशाल ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.  या घटनेचा खुलासा एका सहा वर्षाच्या चिमुकलीनं केला आहे. तिच्या आईनं मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. घटनेच्या 11 दिवसानंतर मुलीनं दिलेल्या माहितीवरुन दहिसर पोलिसांनी तिच्या वडिलांचा मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातून खोदून बाहेर काढला. नवऱ्याच्या हत्येप्रकरणी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 

आव्हान याचिकेत तथ्य, तरुण तेजपालला  नोटीस 

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचं 2012 मध्ये शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वच्या खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तर, त्याची पत्नी सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच असायची. याच काळात शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत तिचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले.  असे विशाल ठाकूर यांनी यावेळी सांगितले.  

दरम्यान, ही गोष्ट रईसला समजली तेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला. पतीचा रोजचा विरोध शाहिदाला नकोसा झाला होता, त्यामुळे तिनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला… आणि 22  मे ला दोघांनी  6 वर्षांच्या चिमकुली समोरच तिझ्या वडिलांच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले.

Edited By - Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live