पुलवामा हल्ल्यातील शहिदाची पत्नी होणार सैन्यात दाखल

साम टीव्ही ब्यूरो
गुरुवार, 27 मे 2021

लग्नानंतर फक्त 9 महिन्यांच पती गमावल्यानंतर निकिता यांनी देखील सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी त्यांनी सर्व परीक्षा व मुलाखतीही उत्तीर्ण केल्या आहेत. आता लवकरच त्या सैन्यात लेफ्टिनेंट Lieutenant पदावर भरती होणार आहेत. 

डेहराडून : काश्मीरच्या पुलवामा Pulwama  येथे 8 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांचा सामना Terrorist attack  करताना डेहराडून Dehradun  येथील रहिवासी विभूती धौंडियाल Vibhuti Dhandial शहीद झाले होते. त्यावेळी ते 34 वर्षांचे होते आणि फक्त 9 महिन्यांपूर्वीच म्हणजेच 18 एप्रिल 2018 रोजी मेजर विभूती निकीता कौल Nikita Kaul यांच्यासमवेत ते विवाहबद्ध झाले होते. मात्र 9 महिन्यांतच मेजर विभूति दहशतवाद्यांचा सामना करताना शाहिद झाले. लग्नानंतर फक्त 9 महिन्यांच पती गमावल्यानंतर त्यांनी देखील सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी त्यांनी सर्व परीक्षा व मुलाखतीही उत्तीर्ण केल्या आहेत. आता लवकरच त्या सैन्यात लेफ्टिनेंट Lieutenant पदावर भरती होणार आहेत.   (The wife of the martyr of Pulwama attack will join the army) 

मेजर विभूति यांच्या निधनानंतर निकिता यांनी अलाहाबादमधील महिला प्रवेश योजना उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. सध्या निकिताचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लेफ्टनंट म्हणून सैन्यात भरती होण्यास त्या तयार आहे. निकिता 29 मे रोजी पासआऊट होईल, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल विकास नौटियाल यांनी दिली आहे.

राहुल गांधीचे पंतप्रधान मोदींना पत्र; लक्षद्वीप बेटाचे रक्षण करण्यासाठी..

दरम्यान, 'आई लव यू विभू' या हृदयस्पर्शी शब्दांनी मेजर विभूती अंतिम निरोप देणाऱ्या निकिता चर्चेत आल्या होत्या. मेजर यांचे कुटुंबीय मूळचे पौड़ी जिल्ह्यातील बदरो धुंड गावचे आहे. तर निकिता या काश्मीरमधील विस्थापित कुटुंबातील आहे. विभूती यांचे वडील ओमप्रकाश धौंडियाल यांना चार मुले आहेत. त्यांना तीन मुली आणि धाकटा मुलगा विभूती.  

आपल्या पतीला अंतिम निरोप देताना निकिता यांचे शब्द सर्वाना खूपच गहिवारून आले होते. 'तुझ्यासारखा नवरा मिळाल्याचा मला खूप सन्मान वाटतो. मी तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहील.. तू सदैव जिवंत राहाशील.  मी तुझ्यावर प्रेम करते विभू.’ अशा शब्दांत त्यांनी मेजर विभूति यांना अखेरचा निरोप दिला होता. मात्र मेजर विभूती केवळ निकिता यांचे पतीच नव्हते तर  त्यांचे जिवलग मित्रही होते.

आपल्या पती शहिद झाल्यानंतर निकिता यंनिदेखील सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षीच नोव्हेंबरमध्ये एसएससीची परीक्षा दिली आणि आता त्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात भरती होण्यासाठी तयार झाल्या आहेत. 34 वर्षांचे मेजर विभूती हे धौंडियाल आर्मीच्या 55 आरआर (नॅशनल रायफल) मध्ये तैनात होते. तीन बहिणींमध्ये विभूति एकुलता एक भाऊ होता. मेजर विभूतीला लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची आवड होती. ते दोनदा नापासही झाले पण शेवटी त्यांना यश मिळालं.

Edited By - Anuradha Dhawade 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live