मधुचंद्राच्या रात्री पतीने ठेवले नाही शारीरिक संबंध, नंतर सुरू केले दुसऱ्या खोलीत झोपणे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 मार्च 2020

शिक्षणाचा खर्च आई-वडिलांकडून आणण्याचा तगादा लावून तरुणीकडे पैशाची मागणी केली. एलएलएमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणी खेड येथे जाऊन पतीच्या वैद्यकीय तपासणीच्या तयारीत होती. त्यापूर्वीच तेथील प्राध्यापकाची नोकरी सोडून पळ काढला. तेव्हापासून त्याने पत्नीशी संपर्क साधला नाही.

यवतमाळ : वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवून सासरी नांदायला गेलेल्या वकील तरुणीला मधुचंद्राच्या रात्रीच आपला डॉक्‍टर नवरा नपुंसक असल्याचा संशय आल्याने धक्का बसला. वर्षभर विविध कारणाने त्रास सहन केल्यानंतर अखेर पीडित विवाहित तरुणीने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

उमरसरा येथील तरुणीचा विवाह सिंघानीयानगरातील डॉक्‍टर असलेल्या तरुणासोबत एक फेब्रुवारी 2019 ला रितीरिवाजाप्रमाणे आर्णी मार्गावरील एका लॉनमध्ये पार पडला. लग्नानंतर वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवून तरुणीने सासरला पाऊल ठेवले. चार फेब्रुवारी रोजी मधुचंद्राच्या रात्री पतीने अपेक्षित शरीरसंबंध प्रस्थापित केले नाही. यात स्वारस्य नसल्याचे पतीने सांगितल्यामुळे विवाहिता आश्‍चर्यचकित झाली. 

आणखी वाचा :: ट्रोल करण्यांना भीत नाही, बोलतच राहणार- अमृता फडणवीस

दरम्यान तरुणाने दुसऱ्या खोलीत झोपणे सुरू केले. यामुळे विवाहितेला जबर धक्का बसला. याबाबत तिने मोठी बहीण व मैत्रिणीसोबत चर्चा केली. नातेवाइकांना माहिती असताना त्यांनीही डॉक्‍टर तरुण नपुंसक असल्याची गोष्ट लपवून ठेवली. लग्नानंतर आठच दिवसांत तरुण खेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या नोकरीवर गेला. त्यानंतर पाच दिवसाने तरुणीदेखील एलएलएमच्या शिक्षणासाठी पुणे येथे गेली. 

शिक्षणाचा खर्च आई-वडिलांकडून आणण्याचा तगादा लावून तरुणीकडे पैशाची मागणी केली. एलएलएमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणी खेड येथे जाऊन पतीच्या वैद्यकीय तपासणीच्या तयारीत होती. त्यापूर्वीच तेथील प्राध्यापकाची नोकरी सोडून पळ काढला. तेव्हापासून त्याने पत्नीशी संपर्क साधला नाही. पाच नोव्हेंबर 2019 ला नातेवाइकांसह तरुणी सिंघानीयानगरातील सासरच्या घरी गेली. त्यावेळी नातेवाइकांनी अपमानास्पद वागणूक देत घराबाहेर ढकलून दिले. 

मार्च ते जून या कालावधीत पुणे येथून ती पतीकडे खेड येथे गेली असता चांगली वागणूक दिली नाही. शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही. याबाबत कुणाला काही सांगितल्यास स्वत: आत्महत्या करेल अथवा तुला ठार मारून टाकील, अशी धमकी दिली. ही गोष्ट तरुणीने आई, वडील, बहीण व इतर नातेवाइकांना सांगितली. त्यापूर्वी यवतमाळात सासरच्या मंडळींच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत कुणाशी बोलू नको, आमची समाजात बदनामी होईल, असे सांगून सासरच्या मंडळीने चूप राहण्याचा सल्ला दिला.

महिला दिनीच पोलिसांत धाव
जागतिक महिलादिन उत्साहात साजरा होत असताना सुशिक्षित असलेल्या वकील तरुणीने न्यायासाठी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. डॉक्‍टर तरुण नपुंसक असताना विवाह करून फसवणूक केली. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून वैद्यकीय तपासणी केली नाही. पाचही जणांविरुद्ध योग्य कार्यवाही करण्यात यावी, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

Web Title: Wife's complaint against an impotent doctor in Yavatmal


संबंधित बातम्या

Saam TV Live