कोल्हापूरः वाठार येथे पतीने केला पत्नीचा खून

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

घुणकी - चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देवघेवीवरुन घुणकी येथील युवकाने पत्नीला दगडाने ठेचून खून केला आहे. ही घटना वाठार (ता.हातकणंगले) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. बिस्मिल्ला आदम पठाण असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी आदम गौस पठाण व बिस्मिल्ला यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दोघात चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देव घेऊन वारंवार वाद होत होता. गुरुवारी रात्री आदम व बिस्मिल्ला दोघेही वाठार येथे गेले होते. सिमेंट फॅक्टरी जवळ त्यांच्यात जोराचा वाद झाल्याने आदमने दगडाने बिस्मिल्ला हीला मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला.  

ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आदमला अटक केली. आदमने खून केल्याची कबुली देऊन स्वतः फिर्याद दिली. या घटनेनंतर पहाटे मृतदेहाचे शवविच्छेदन नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

बिस्मिल यांच्या मागे पत्ती आदम सासू सासरे दोन मुलगे असा परिवार आहे.  तिचे माहेर सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे येथील आहे. माहेरी वडील, सावत्र आई भाऊ बहिणी आहेत. तिच्या मृत्युची बातमी कळताच नातेवाईकानी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ तणावाचे वातावरण झाल्याने महिला पोलिसासह बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Murder in Vadgaon Vathar Road

संबंधित बातम्या

Saam TV Live